Home /News /entertainment /

Rang Majha Vegla: आधी कार्तिकसाठी केली वडाची पूजा; आता दीपाच लावून देणार कार्तिकचंं आयेशाशी लग्न, मालिकेत मोठा ट्विस्ट

Rang Majha Vegla: आधी कार्तिकसाठी केली वडाची पूजा; आता दीपाच लावून देणार कार्तिकचंं आयेशाशी लग्न, मालिकेत मोठा ट्विस्ट

Rang Majha Vegla: आधी कार्तिकसाठी केली वडाची पूजा; आता दीपाच लावून देणार कार्तिकचंं आयेशाशी लग्न, मालिकेत मोठा ट्विस्ट

Rang Majha Vegla: आधी कार्तिकसाठी केली वडाची पूजा; आता दीपाच लावून देणार कार्तिकचंं आयेशाशी लग्न, मालिकेत मोठा ट्विस्ट

कार्तिक दीपा एकत्र यावेत यासाठी इतके दिवस सुरू असलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरणार आहे. मालिकेच्या महाएपिसोडमध्ये दीपा आयेशाला कार्तिकबरोबर लग्न लावून देण्याचं वचन देणार आहे.

  मुंबई, 16 जून:  स्टार प्रवाहवर ( Star Pravah) टीआरपीच्या रांगेत सतत नंबरवर असलेल्या रंग माझा वेगळा ( Rang Majha Vegla) मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  गेली अनेक दिवस दिपा आणि कार्तिक ( Deepa Kartik) यांना एकत्र आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. दिपाही कार्तिकीला तिच्या वडिलांची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र मालिकेत आता नवा ट्विस्ट आलाय. इतके कार्तिकसाठी झुरणारी दीपा स्वत:चं कार्तिक आणि आयेशाचं लग्न लावून देणार आहे. मालिकेच्या येत्या भागात दीपा आयेशाला 'मी तुझं कार्तिकबरोबर लग्न लावून देईल', असं वचन त्याला देते.  मालिकेच्या 19 जूनच्या महाएपिसोडमध्ये मालिकेत मोठा ट्विस्ट पहायाला मिळणार आहे. ( Rang Majha Vegla Maha Episode) मालिकेचा प्रोमो समोर आला असून यात दाखवल्याप्रमाणे, दीपा वटपौर्णिमेची पूजा करत असताना तिला रस्त्यात आयेशा दिसते. कार्तिकपासून दुरावलेली आयेशा वेड्यासारखी रस्त्यावर फिरत असते. आयेशा रस्त्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये जीव देण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी दीपा तिचा जीव वाचवते. 'कार्तिक माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये', असं म्हणत आयेशा जीव देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दीपा तिला 'मी स्वत: तुझं कार्तिकशी लग्न लावून देईन', असं वचन तिला देते.   मालिकेनं घेतलेल्या या नव्या वळणानं दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात कायमचा दुरावा येणार असं दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मालिकेच्या 19 जूनच्या महाएपिसोडमध्ये हा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपानं घेतलेल्या या मोठ्या निर्णयानं आता कोणतं नवं संकट कोसळणार आणि दीपा त्याला कशी सामोरी जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - रणबीरच्या 'त्या' एका निर्णयामुळं Brahmastra चित्रपट बनवायला लागली 9 वर्षे, आयान मुखर्जीनं केला खुलासा तसंच यावर सौंदर्या आणि कार्तिक यांची काय प्रतिक्रीया असणार आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे दीपिका आयेशा आणि कार्तिक यांच्या लग्नाला होकार देणार का?  प्रोमो पाहून प्रेक्षकांना पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मात्र मालिकेला चांगलंच ट्रोल केलं आहे. 'मालिकेची कथा आता जरा ओव्हरचं होतेय', असं म्हणतं नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तर एका युझरनी म्हटलंय, 'टीआरपीच्या नावाखाली प्रेक्षकांना काहीही दाखवणं बंद करा'. तर दुसऱ्या युझरनी म्हटलंय, 'आयेशाचं भांड फोडायचं सोडून किती फालतू गोष्टी मालिकेत दाखवल्या जात आहेत'.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या