Home /News /entertainment /

पिंकी करणार शांतीत क्रांती! टराटरा फाडणार युवराजचे कपडे; काय घडणार येत्या भागात?

पिंकी करणार शांतीत क्रांती! टराटरा फाडणार युवराजचे कपडे; काय घडणार येत्या भागात?

पिंकीचं युवराजबरोबर लग्न झाल्यापासून तिच्या वाट्याला सुख काही आलेलं नाही. अशातचं आईसाहेब पिंकीला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पिंकी आता शांतीत क्रांती करुन सगळ्यांना तिचा खरा अवतार दाखवणार आहे.

  मुंबई, 05 जुलै:  स्टार प्रवाहवरील ( Star pravah) सगळ्याच मालिका सध्या टॉपमध्ये आहेत. प्रत्येक मालिकेचं कथानक नव वळण घेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. स्टार प्रवाहवरील एक धम्माल मालिका म्हणजे पिंकीचा विजय असतो ( Pinkicha vijay Aso) मालिकेत नुकतंच सगळ्यांच्या लाडक्या पिंकीचं लग्न झालंय. युवराजबरोबर लग्न करुन पिंकी धोंडेपाटलांच्या घरी आली. मात्र घरी आल्यापासून पिंकीच्या वाट्याला सुख काही आलेलं नाही. पिंकीच्या लाडक्या सासूबाईंनी तिला घरातून बाहेर काढलंय. तर दुसरीकडे युवराजही पिंकीपासून लांब पळताना दिसत आहे. परंतू या सगळ्यातही पिंकीनं तिची हुशारी आणि नटखटपणा सोडलेला नाही. सगळा अन्याय सहन करुन पिंकी आता युवराजचं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र पिंकीची सासू काही ना काही अडथळा आणत आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, पिंकीची सासू म्हणजेच आईसाहेब आणि पिंकीची जाऊ पिंकीला त्रास देण्यासाठी प्लान रचतात. भर पावसात पिंकीला बंगल्याच्या बाहेर कपडे धुण्यासाठी बसवतात. पिंकी कपडे धुत असताना तिचं काम आणखी वाढवण्यासाठी पिंकीची जाऊ मुद्दाम तिचं काम वाढवते. युवराजचे कपडेही ती पिंकीला धुवायला सांगते. आईसाहेब हे मुद्दाम करत असल्याचं पिंकीच्या लक्षात येतं मात्र युवराजला मिळवायचं असेल तर शांत राहणं महत्त्वाचं आहे पिंकीच्या लक्षात येतं.
  हेही वाचा - देवकी लवकर ये सिरीयलमध्ये! प्रेक्षकांना येतेय अभिनेत्रीची आठवण, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा जाऊबाई पिंकीचं काम वाढवत असताना, 'अजून काही आहे का? रुमाल, चिंधी, दोरे ते पण घेऊ या तेही धुवून देते',असा टोमणा पिंकी मारते. 'पिंकी आता शांतीत क्रांती करायला पाहिजे', असं स्वत: सांगून पिंकी तिच्या पिंकीगिरीला सुरुवात करते आणि युवराजच्या कपडे आपटून आपटून त्याचा चोथा करुन टाकते. युवराजचा फाटलेला शर्ट समोर ठेवून 'धनी आय एम सॉरी', असं म्हणत पिंकी तिच्या धम्माल प्लानला सुरुवात करते. पिंकी जरी मस्तीखोल किंवा अल्लड असली तरी ती नेहमीच सगळ्यांची मनं जिंकत आली आहे. सरकार वाड्यात पिंकीनं सुरू केलेली पिंकीगिरी आता कुठपर्यंत चालणार हे पाहणे इंटरेस्ट्रिंग ठरेल. त्याचप्रमाणे पिंकिच्या अशा वागण्यानंतर पिंकीच्या सासुबाईंचं पुढचं पाऊल काय असणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  येत्या 8 जुलैला पिंकीचा विजय असो मालिकेत हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. युवराज आणि पिंकी यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईसाबाहेबांचा प्लान फसणार असल्याचं प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पिंकी आणि युवराज पहिल्यांदाच एकमेकांच्या जवळ येणार आहेत. त्यामुळे मालिकेचे येणारे भाग पाहणं आणखी उत्सुकतेचं ठरलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या