Home /News /entertainment /

कीर्ती शुभमचा नवा Look पाहून प्रेक्षक हैराण! दोघांना ओळखणं झालंय कठीण

कीर्ती शुभमचा नवा Look पाहून प्रेक्षक हैराण! दोघांना ओळखणं झालंय कठीण

कीर्ती शुभमचा नवा Look पाहून प्रेक्षक हैराण! दोघांना ओळखणं झालंय कठीण

कीर्ती शुभमचा नवा Look पाहून प्रेक्षक हैराण! दोघांना ओळखणं झालंय कठीण

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभम आणि कीर्ती नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा नवा लुक पाहून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

  मुंबई, 23 जून: स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) मालिकेत आयपीएस कीर्ती (IPS Kirti) तिची ड्यूटी सांभाळून घरही उत्तमरित्या सांभाळता दिसत आहे. मात्र मालिकेत काहीसा ट्विस्ट येणार  असून यात कीर्ती आणि शुभम (Kirti-Shubham) यांचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा नवा अवतार पाहून प्रेक्षकही हैराण झाले आहेत. कीर्ती आधीपासूनच बिधास्त होती पण साधा सरळ शुभमचा नवा अवतार पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता सगळा खटाटोप दोघेही तुषारला निर्दोष सिद्ध करण्यासाठी करणार आहे. तुषारला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं सगळ्यांनाच चिंता लागून राहिली आहे. त्याला वाचवण्यासाठी कीर्ती आणि शुभम नव्या रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलाला सुगंध मातीचा मालिकेत आपण पाहत आहोत की, तुषारच्या नव्या कामात त्याचा मित्र त्याला फसवतो आणि त्यानं केलेल्या वाईट कामाचं खापर तुषारवर फोडून तुषारला दोषी ठरलं जात. तुषारवर चोरीचा आळ आणून त्याला अटक करण्यात येते. कीर्ती स्वत: आयपीएस ऑफिसर असूनही तिच्या दिराला ती वाचवू शकत नाही. कारण कीर्तीकडे तुषार निर्दोष असल्याचे कोणेतीही ठोस पुरावे नाहीत. मात्र तो निर्दोष असल्याची खात्री कीर्तीला आहे आणि त्यामुळे कीर्ती शुभमच्या मदतीनं तुषार प्रकरणाचा छडा लावणार आहे. हेही वाचा - Snehalata Vasaikar: अनुराधा फेम अभिनेत्रीचे फोटो उडवत आहेत धुव्वा, हटके photoshoot पाहा
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  तुषार चोर नसून विनीतच चोर असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी शुभम आणि कीर्ती वेश बदलून त्याच्या दुकानात जातात. त्याच्या दुकानात खोटे ग्राहक म्हणून जाऊन त्याचा सगळा काळाबाजार उघड करण्याचा प्लान कीर्ती आणि शुभम आखतात. दोघांचा बदलेला लुकमध्ये दोघेही हटके अंदाजात दिसत आहेत.  व्हाइट टॉप, ब्लू जीन्स आणि त्यावर ब्राऊन जॅकेटमध्ये कीर्ती फुलऑन डॅशिंग अंदाजात दिसत आहे. तिच्या लांब सडक केसांचे झालेले कुरळे केस तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तर शुभमचा लुक पुर्णपणे बदलला असून शुभमला ओळखणंही कठीण झालं आहे. मालिकेच्या भागात कीर्ती आणि शुभम वेश बदलून विनीतच्या खोट्या कर्मांचा छडा लावून तुषार निर्दोष सिद्द करू शकतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या