Home /News /entertainment /

किरण माने प्रकरणाला नवं वळण, 'सर्व आरोप बिनबुडाचे म्हणत...'अभिनेत्यावर वाहिनीकडून गंभीर आरोप

किरण माने प्रकरणाला नवं वळण, 'सर्व आरोप बिनबुडाचे म्हणत...'अभिनेत्यावर वाहिनीकडून गंभीर आरोप

वाहिनीने पत्रक जाहीर करत किरण मानेंवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे हा विषय फारच गंभीर होत चालल्याचं दिसत आहे.

    मुंबई, 16 जानेवारी-   आपण गेली चार दिवस ऐकत आहोत की, राजकीय भूमिका मांडल्याने 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali Ho)  या मालिकेतील अभिनेते किरण माने  (Kiran Mane)   यांना काढून टाकण्यात आलं आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्यांवर गंभीर आरोप देखील केले होते. त्यांना सर्व स्तरांतून समर्थन मिळत आहे. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे, वाहिनीने पत्रक जाहीर करत किरण मानेंवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे हा विषय फारच गंभीर होत चालल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर किरण माने यांना समर्थन आणि वाहिनीचा निषेध होत असताना. आता स्टार प्रवाह वाहिनीने अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी किर माने यांचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी हे सर्व आरोप काल्पनिक आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. हा सर्व प्रकार दुर्दैवी असल्याचं मत या वाहिनीने मांडलं आहे. वाहिनीने पत्रक जाहीर करत म्हटलं आहे, 'निर्मिती संस्थेने माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला. कारण मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. मालिकेतील इतर कलाकारांशी विशेषतः महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तवणुकीमुळेच हा निर्णय घेतल्याचं वाहिनीचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. माने यांना वारंवार बजावून देखील या गोष्टी सतत घडत राहिल्या, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. तसेच आम्ही या निर्णयाचं समर्थन करत असल्याचं वाहिनीने म्हटलं आहे'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या