'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण ....

'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण ....

नव्याचे नऊ दिवस ओसरत नाहीत तोच मेधाने आता आपले रंग दाखवायला सुरुवात केलीय.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेत एक धक्कादायक वळण आलंय . कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी झटणाऱ्या नेहावरच राहतं घर सोडण्याची वेळ ओढावलीय. नेहावर घर सोडण्याची वेळ आणलीय प्रिन्सरावांची बायको म्हणजेच मेधाने.

काही दिवसांपूर्वीच प्रिन्स आणि मेधाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. नव्याचे नऊ दिवस ओसरत नाहीत तोच मेधाने आता आपले रंग दाखवायला सुरुवात केलीय. मेधाने हे लग्न रांगडे पाटलांना धडा शिकवण्यासाठी आणि पैश्यांच्या हव्यासापोटी केलंय. घरातल्या प्रॉपर्टीवर डोळा असणाऱ्या मेधाच्या मनसुब्यात नेहा अडथळा ठरतेय. मेधाच्या गुप्त हालचालींवर नेहा लक्ष ठेवून आहे, आणि नेमकी हीच गोष्ट मेधाला खटकतेय. त्यामुळेच नेहाचा काटा काढण्याचं तिने ठरवलंय.

नेहाला घरातून बाहेर काढलं तरच आपण आपलं मिशन फत्ते करु शकतो असा विश्वास मेधाला वाटतोय. यासाठीच तिने एक प्लॅन आखलाय. मेधाचं हे षडयंत्र नेमकं काय आहे? नेहाला घराबाहेर काढण्यात ती यशस्वी होणार का? या कठीण प्रसंगात नेहाला कोण साथ देणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘नकळत सारे घडले’च्या यापुढील भागांमध्ये मिळणार आहेत.

दरम्यान, ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथांतून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूपं पाहायला मिळतील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजात घडणाऱ्या याच घटनांविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करणार आहे.

दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 09:39 AM IST

ताज्या बातम्या