मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai kUthe kya karte : गुडघेदुखीला रडणाऱ्या आई कांचननं धरला ढोल ताशावर ठेका; 800 भागांच जंगी सेलिब्रेशन

Aai kUthe kya karte : गुडघेदुखीला रडणाऱ्या आई कांचननं धरला ढोल ताशावर ठेका; 800 भागांच जंगी सेलिब्रेशन

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते ही मालिका सध्या चांगलीच ट्रोल होत आहे. मात्र असं असलं तरी नुकतेच मालिकेनं 800 भाग पूर्ण केलेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 04 ऑक्टोबर : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका मागच्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेचं कथानक त्यातली कलाकर सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अरुंधती हे पात्र तर महाराष्ट्राच्या घराघरात ओळखलं गेलं, प्रेक्षकांना आपलं वाटलं.  आई कुठे काय करते या अत्यंत नाजूक विषयावर आधारित या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मध्यंतरी मालिकेचं कथानक भरकटल्यासारखं वाटतं असलं तरीही प्रेक्षकांनी मालिका पाहणं काही सोडलेलं नाही. मालिकेसंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आई कुठे काय करते मालिकेनं बघता बघता 800 भागांचा टप्पा पार केला आहे.  नुकतेच मालिकेनं 800वा भाग शुट केला आणि हा आनंदाचा क्षण कलाकारांनी एकत्र येत सेलिब्रेट केला. मालिकेच्या सेटवर ढोल ताश्याच्या गजरात कलाकारांनी एकच जल्लोष केला. सगळे कलाकार शुटींग आटोपून दणकून नाचताना दिसले.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मालिकेच्या यशाचं कारण माहितेय का? मिलिंद गवळींनी केला खुलासा

मालिकेत एरवी गुडघे दुखतात म्हणून सतत रडणाऱ्या आई कांचनने सक्सेस पार्टीमध्ये चांगलाच ठेका धरला होता. ढोल ताशा वाजताना कांचन म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर बेभान होऊन तो क्षण एंजॉय केला.

आप्पा आई कांचन, अनिरुद्ध, संजना, अनिश इशा, अभि नितीन सगळेच पारंपरिक कपड्यात आले होते. केवळ कलाकार नाही तर मालिकेत पडद्यामागे काम करणारी सगळीच मंडळी मालिकेच्या 800 भागांचं जल्लोषात सेलिब्रेट करताना दिसले.  आई कांचनचा डान्स पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे. कांचन कडक अशी प्रतिक्रिया कांचनच्या डान्सवर येत आहेत.

आई कुठे काय करते मालिकेच्या सध्या भागात आपण पाहत आहोत की देशमुखांच्या घरात नुकताच नवरात्रौत्सव साजरा झाला. सगळ्यांनी देशमुखांच्या घरात दांडिया खेळल्या. तर आता अरुंधती कॉलेजमध्ये जाणार आहे. अरुंधतीच्या कॉलेजचा पहिला दिवस असतो आणि सगळी मुलं तिला कॉलेजला सोडायला येतात. आशुतोष अरुंधतीला ऑल द बेस्ट म्हणत गुलाबाची फुल देतो. आता अरुंधती कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळे काय प्रतिक्रिया देणार? इशा आणि अरुंधती एकाच कॉलेजमध्ये गेल्यानं अनिरुद्धचा होणारा त्रागा कमी होणार का हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news