मुंबई, 28 डिसेंबर - छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत सतत अरुंधतीला(Arundhati) आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढावं लागतं. आत अनिरुद्धने संजनासोबत वेगळा संसार थाटला आहे. तर अरुंधती देखील तिच्या नव्या आयुष्यात नोकरी व तिच्या गाण्यात रूळली आहे. अशातच तिच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एंट्री झाली आहे. तिच्या या मित्रासोबत अरुंधतीला पाहून अनिरूद्धचा नेहमी तिळपापड होत असतो.
सध्या या मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्धचा मोठा मुलगा अभिषेकच्या लग्नाचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे देशमुखांच्या घरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातीलच एका कार्यक्रमता अरुंधती आणि तिचा मित्र आशुतोष यांनी एका गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी घरातील इतर मंडळी देखील त्यांच्यासोबत डान्स करत आहे. त्यांचा हा डान्स मात्र अनिरुद्धच्या डोळ्यात चांगलाच रूतला आहे. नेटकऱ्यांनी देखील यावरून अनिरुद्धच्या सुनावलं आहे.
वाचा-'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील 'या' अभिनेत्याचं झालं लग्न
स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टा पेजवर या मालिकेचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अभिषेकच्या लग्नातील संगीत सोहळ्यात घरातील सर्वज धमाल डान्स करताना दिसत आहेत. यावेळी आशुतोष आणि अरुंधती एकत्र डान्स करताना दिसत आहे. मात्र या दोघांन एकत्र पाहून अनिरुद्धचा मात्र रागाने तिळपापड झाला आहे.
View this post on Instagram
आशुतोष आणि अरुंधतीला एकत्र डान्स पाहून अनिरुद्ध मात्र रागाने लाल झाला आहे. हा डान्स पाहून संजनाही त्यालाही डान्स करण्याचा आग्रह करते. मात्र त्यावेळी तो तिच्याकडे रागाने पाहतो आणि तिला डान्स करण्यास नकार देतो व तिला देखील थांबवतो. नेटकऱ्यांनी मात्र यावरून अनिरुद्धला चांगलेच सुनावलं आहे. एक नेटकऱ्याने म्हटले आहे की,म्हणजे स्वतः संजना सोबत लग्न करून मोकळा झाला आणि बायकोचा मित्र पण सहन होत नाही अस कस चालेल अनिरुध्द ..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,याला बायको पण पाहिजे आणि सवत पण..अशा अनेक कमेंट यावर आल्या आहेत.
वाचा-Shahnaz-Asim वादात 'या' टीव्ही अभिनेत्याची उडी; असीमची केली कानउघडणी
आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेज मित्र आहे. कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोष यांची भेट झाली आहे. आशुतोषच्या डोळ्यात नेहमी अरुंधतीविषयी प्रेम दिसते. पण त्याने आजपर्यंत कधी तिच्यासमोर बोलून दाखवले नाही. मात्र भविष्यात ही जोडी एकत्र येणार का याबद्दल देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.