कांचन सुलु आणि राजा भाऊंना घेऊन येताच राजा भाऊ आणि आप्पा यांच्यात धम्माल संवाद सुरु होतो. आप्पा आणि राजा भाऊ यांची जबरदस्त केमिस्ट्री येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - De Dhakka 2: दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस! 'दे धक्का 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर राजा भाऊंना ऐकायला कमी येत असल्यानं आप्पा त्यांची भंकस देखील करताना दिसणार आहेत. सुलु आणि भाऊ आता देशमुखांच्या घरात आल्यानं घरातील वातावरण काहीस बदलण्यास मदत होणार आहे. सुलु आणि राजा भाऊंच्या एंट्रीनं मात्र संजनाच काय होणार हे पाहणं येत्या भागात इंटरेस्ट्रिंग ठरणार आहे. सुलु आणि कांचन यांचा स्वभाव बऱ्यापैकी सारखा असल्याचं मालिकेचा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. त्यामुळे दुसऱ्या कांचनला संजना कशी सामोरी जाणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. तसंच सुलु मावशी संजना धडा शिकवणार का? संजनाची फजिती होणार का याचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment, TV serials