Home /News /entertainment /

इशा पडणार पुन्हा प्रेमात! साहिलनंतर नीलची एंट्री; काय असणार अरुंधतीचा निर्णय?

इशा पडणार पुन्हा प्रेमात! साहिलनंतर नीलची एंट्री; काय असणार अरुंधतीचा निर्णय?

इशा पडणार पुन्हा प्रेमात! साहिलनंतर नीलची एंट्री; काय असणार अरुंधतीचा निर्णय?

इशा पडणार पुन्हा प्रेमात! साहिलनंतर नीलची एंट्री; काय असणार अरुंधतीचा निर्णय?

आई कुठे काय करते मालिकेत इशा आणि साहिल यांच्या ब्रेकअपमुळे इशासह कुटुंबातील सर्वांनाच त्रास झाला. मात्र आता बावरुन गेलेल्या इशाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम बहरणार असून तिच्या आयुष्यात नीलची एंट्री होणार आहे.

  मुंबई, 27 जून: स्टार प्रवाहवरील ( Star Parvah) आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे अरुंधती  ( Arundhati) कामानिमित्त इंदौरला गेलीय तर दुसरीकडे अनिरुद्धच्या ( Aniruddha) विचित्र वागण्यामुळे आप्पांना त्रास होतोय. इशा देखील नुकतीच साहिल प्रकरणामुळे काहीशी निराश आहे.  घरातील बिघडलेल्या वातावरणामुळे मुलांनी बाहेर फिरायला जाण्याची तयारी केली आहे. इशाला घेऊन यश आणि गौरी फिरायला निघाले आहेत. मालिकेच्या याच नोटवर मालिकेत आता नव्या पात्राची एंट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुलू मावशी आणि राजा भाऊंची मालिकेत एंट्री झाली होती. आता आखणी एका पात्राबरोबर मालिकेचं कथानक पुढे सरकणार आहे. साहिल प्रकरणामुळे इशाला धक्का बसला आहे. दोघांच्या ब्रेकअप नंतर इशा एकटी पाडली. साहिलच्या जाण्याने इशा फारच हळवी झाली आहे. मात्र त्याच इशाला सावरण्यासाठी नील ( Neel) तिच्या आयुष्यात येणार आहे. ( New Entry in Aai Kuthe Kay Karte) मालिकेत नीलची एंट्री होणार आहे. यश आणि गौरी यांच्या फ्रेंड ग्रुपमधील हा त्यांचा मित्र आहे. पिकनीकवेळी पहिल्यांदाच इशा आणि नील यांची ओळख होणार आहे. इशाला पाहता क्षणीच नील तिच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  हेही वाचा - 'आई कुठे काय करते' मालिकेतून अरुंधतीने घेतला ब्रेक; समोर आलं कारण मालिकेच्या एक प्रोमो प्रदर्शित झाला असून पिकनीकला गेल्यावर इशा आणि नीलची पहिली भेट दाखवण्यात आली आहे. यश गौरीसह सगळे मित्र मैत्रिणी फार्महाऊसमध्ये जातात. शेवटी राहिलेल्या इशाला नीलचा धक्का लागतो आणि तो तिचा हात पकडतो असा प्रसंग प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे. इशा आणि नीलची पहिली भेट फार यश पाहतो. इशासाठी नीलच्या मनात काहीतरी भावना आहेत याचा अंदाज यशला येतो. इशाच्या आयुष्यात झालेले नीलची एंट्री इशा स्वीकारणार का? इशाचा पुढचा प्रवास कसा असणार ? त्याचप्रमाणे नीलला इशा आवडली असल्याचं यशला कळल्यानं तो आता यावर काय प्रतिक्रिया देणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की अनिरुद्ध अरुंधतीच्या घरी जातो तेव्हा यश, संजना आणि आप्पा तिथे पोहोचतात आणि त्याच्या कानाखाली मारतात. तर दुसऱ्या दिवशी घरी संजनाचा धक्का लागून इशा जिन्यावरुन खाली पडते. त्यामुळे अनिरुद्ध संजनावर तू अनघाला मुद्दाम ढकलल्याचा आरोप करतो. त्यामुळे आता अरुंधती इंदौरहून परतल्यानंतर तिच्या समोर अनेक संकटं उभी राहणार आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या