Home /News /entertainment /

Aai Kuthe Kay Karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल

Aai Kuthe Kay Karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल

Aai kuthe kay karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल

Aai kuthe kay karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल

देशमुखांच्या घरात लवकरच लहान पाहूणा येणार आहे. अनघा गरोदर असल्यानं घरातील वातारण चांगलं रहावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. मात्र अनघाचाच अपघात होणार आहे आणि या अपघाताला संजनाला जबाबदार धरलं जाणार आहे.

  मुंबई, 24 जून: स्टार प्रवाहवरील आई कुठे काय मालिकेत सध्या आपण पाहत आहोत की अनिरुद्धचा खरा चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. अरुंधतीचा मीडियासमोर मागितलेली माफी हा त्याचा डाव असल्याचं लक्षात आल्यानं आशुतोषनं त्याला पुन्हा माझ्या वाट्याला न जाण्याची ताकीद दिली आहे.  देशमुखांच्या घरात लवकरच लहान पाहूणा येणार आहे. अनघा गरोदर असल्यानं घरातील वातारण चांगलं रहावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत.  मात्र अनघाचाच अपघात होणार आहे आणि या अपघाताला संजनाला जबाबदार धरलं जाणार आहे. संजनामुळे अनघा पायऱ्यावरुन घसरल्यानं अनिरुद्ध संजनाला चांगलेच खडे बोल सुनावणार आहे. मालिकेचा प्रोमो समोर आला असून प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अनघाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, संजना रुममधून फोनवर बोलत खाली येत असते. तर अनघा देखील त्याच जिन्यानं तिच्या रुमकडे जात असते. घाई गडबडीत असलेल्या संजनाचा अनघाला धक्का लागोत आणि जिन्यावरुन अनघाचा पाय सटकतो. पाय सटकल्यानं अनघाचं डोक भिंतीला आपटतं आणि जिन्यावरुन खाली पडते. तेवढ्यात अनघा मोठ्यानं ओरडते आणि अनघाला वाचवते. संजनाच्या आवाजाने अनिरुद्ध बाहेर येतो तेव्हा संजना अनघाला हॉलमध्ये बसवून तिला पाणी देत असते. हेही वाचा - 'देशातले खरे हिरो म्हणजे','आई कुठे काय करते'फेम मिलिंद गवळींची पोस्ट होतेय VIRAL
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  हा सगळा प्रकार पाहून अनिरुद्ध भडकतो. संजना आज तू विकृतपणाचा कळस केलाय. संजनाला मुद्दाम ढकललंस असं म्हणजे मोठ्याने तिच्या अंगावर ओरडून तिला खडे बोल सुनावतो. अनिरुद्धनं केलेला आरोप ऐकून संजना पूर्ती हादरुन जाते. अनघाचा झालेला अपघात हा नकळत झाल्याचं आपल्याला प्रोमोमध्ये पहायाल मिळत आहे. मात्र संजनानं मुद्दाम अनघाला ढकललं असा समज अनिरुद्धचा झाला आहे. आपण पाहिलं तर मागचे अनेक दिवस संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात खटके उडाले आहेत. अनिरुद्धने संजनाकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. परंतू संजना तिच्या बाजूनं त्यांचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अनघाचा अपघातानं देशमुख कुटुंबियांची काय प्रतिक्रिया असणार ? संजना तिची बाजू सिद्ध करु शकेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे अपघातामुळे अनघा आणि तिच्या बाळाला काही दुखापत होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या