मुंबई, 29 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या राजकारणातले धुरंधर नेते, शिवसेना खासदार संजय राऊत आजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत दिसले. कधी ‘सामना’ या वृत्तपत्राचा चेहरा म्हणून तर कधी शिवसेनेची भूमिका मांडणारे राजकारणी म्हणून. पण आता संजय राऊत यांना एक वेगळीच ऑफर आली आहे. आणि तीदेखील चक्क कुणाल कामराकडून. ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये सहभागी होण्याची विनंती स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामराने संजय राऊत यांना केली आहे.
कुणाल कामराच्या 'शटअप या कुणाल' या शोच्या दुसऱ्या सिझनच्या पहिल्या भागात संजय राऊत यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा कुणालने Twitter वरून व्यक्त केली आहे. संजय राऊत आले, तर आणि तरच दुसरा सीझन सुरू करेन असंही त्याने यात म्हटलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत कुणाल कामराची ही ऑफर स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये संजय राऊत यांचा महत्वाचा सहभाग असतो. सध्या सत्तेत असलेली महाविकास आघाडीची सत्ता उदयास येण्यातही संजय राऊत यांचा मोठा सहभाग आहे.
मूळ पत्रकार असलेल्या संजय राऊतांची लेखणीही तेवढीच दमदार आहे. त्यांच्या विधानांमुळे राज्यातील राजकारणात मोठ-मोठे बदल झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत कुणालच्या शोमध्ये जाणार का? आणि गेले तर तिथे जाऊन कुणाल कामरला कसे सामोरे जाणार याकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलंय.
I will only restart our podcast Shut Up Ya Kunal if Sir @rautsanjay61 agrees to be the first guest of season 2...
Other than that there’s no chance
🙏🙏🙏
शटअप या कुणाल या पॉडकास्टचा पहिला सिझनही चांगलाच गाजला होता. या शोमध्ये आत्तापर्यंत काँग्रेस नेते मिलिंद देवरा, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पत्रकार रविश कुमार जेएनयुचा नेता कन्हैय्या कुमार, गीतकार जावेद अख्तर, एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी अशी अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.