सुशांत आजारी असूनही पार्टी करायची रिया चक्रवर्ती, ड्रायव्हरने केले मोठे खुलासे?

सुशांत आजारी असूनही पार्टी करायची रिया चक्रवर्ती, ड्रायव्हरने केले मोठे खुलासे?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajpu Case) त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या धीरेन याने रिया चक्रवर्तीबाबत (Rhea Chakraborty) काही मोठे खुलासे केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या (Sushant Singh Rajput Death) 2 महिन्यानंतरही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्याच्या कुटुंबीयांना या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही आहेत. या प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन बाबी समोर येत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेल्सवर देखील याप्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे करण्यात येत  आहेत. हे खुलासे धक्कादायक आहेत. एका मीडिया अहवालामध्ये सुशांतचा ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या व्यक्तीशी बातचीत केल्याचा दावा केला जात आहे. यातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीबाबत (Rhea Chakraborty) काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सुरुवातील नेपोटिझमचा (Nepotism) वाद पाहायला मिळाला होता. मात्र सुशांतच्या वडिलांनी (KK Singh) त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. त्यानंतर रिया आणि सुशांतच्या नात्यासंबंधित विविध अँगलने या प्रकरणचा तपास सुरू आहे. या दरम्यान सुशांतबरोबर दीर्घकाळासाठी काम करणाऱ्या ड्रायव्हर धीरेनबरोबर टाइम्स नाऊने बातचीत केल्याचा दावा केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, धीरेनच्या मते रिया सुशांतला नियंत्रणामध्ये ठेवायची. धीरेनने असे देखील सांगितले की जेव्हा सुशांत आजारी होता तेव्हा रिया पार्टी करायची.

(हे वाचा-अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने सुशांतबाबत पहिल्यांदा शेअर केली अशी पोस्ट)

या अहवालानुसार धीरेनने अशी माहिती दिली आहे की, रिया सुशांतच्या स्टाफला नोकरीवरून काढून टाकून तिच्या स्टाफला कामावर ठेवणार होती. धीरेनने या संभाषणामध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या सुशांतची मोठी बहीण प्रियंका एकदा रिया आणि तिचा भाऊ शौविकबरोबर एका पार्टीमध्ये गेले होते, मात्र पार्टीवरून परतल्यानंतर ती दिल्लीला गेली होती. या पार्टीमध्ये कदाचित त्यांच्यामध्ये मोठे भांडण झाले होते, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण, कुटुंबीयांनी जारी केले UNSEEN VIDEO)

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या मते रिया सुशांतला त्याच्या परिवाराशी बातचीत करू द्यायची नाही. त्यांची अशी धारणा आहे की जर आज सुशांत त्यांच्याशी बोलत असता तर तो आज जिवंत असता

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 14, 2020, 5:06 PM IST

ताज्या बातम्या