मुंबई, 27 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) सातत्याने बॉलिवूडवर विशेषत: दिग्दर्शक करण जोहरवर (karan johar) निशाणा साधत आली आहे. आता करणनंतर तिनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनाही टार्गेट केलं आहे. करणवरून कंगनाने आदित्य यांना लक्ष्य केलं आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलसांनी (mumbai police) करण जोहरऐवजी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. यानंतर कंगना रणौतच्या टीमने ट्वीट केलं आहे.
कंगनाच्या टीमने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणं बंद करा"
How can @MumbaiPolice display blatantly shameless nepotism even in issuing summons? Kangana has been issued summon not her manager but Chief Minister’s son’s best friend’s manager is called for questioning, why? saheb ko pareshani na ho issliye?
"समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतक्या निर्लज्जपणे नेपोटिझम कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाचा सर्वात चांगल्या मित्राच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?", असं पुढील ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सुशांतने मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरी 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत 37 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचं सांगितलं. आता कंगना रणौत, महेश भट्ट यांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. जर गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असं देशमुख म्हणाले.