Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी ED अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'राबता' सिनेमातील दिग्दर्शकाच्या घरावर छापा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी ED अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'राबता' सिनेमातील दिग्दर्शकाच्या घरावर छापा

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी ईडी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर छापा टाकला आहे. तसंच लवकरच NCBच्या तपासालाही वेग येण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 14 ऑक्टोबर अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) आता अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. सुशांतप्रकरणी ईडी, सुशांतने केलेली पैशांची देवाण-घेवाण डोळ्यासमोर ठेऊन तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने दिग्दर्शक दिनेश विजान (Dinesh Vijan) यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये छापेमारी केली.सुशांतने दिनेशसोबत 'राबता' हा सिनेमा केला होता. सुशांतसोबत या सिनेमामघ्ये अभिनेत्री क्रिती सॅनॉन झळकली होती. राबता या सिनेमाबाबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासंबंधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक दिनेश यांची चौकशी केली. तसंच त्यांच्याकडून काही कागदपत्रही ताब्यात घेतली आहेत. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. राबता हा सिनेमा 9 जून 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक दिनेश विजानचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमामध्ये सुशांत आणि क्रितीसोबत राजकुमार राव, वरुण शर्मा हे कलाकारही होते. राबता सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी NCB देखील तपास करत आहे. NCB ने 15 मोबाईल फोन जप्त करुन फॉरेंन्सिक रिपोर्टसाठी पाठवून दिले आहेत. यापैकी काही फोन ड्रग पेडलर्स आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे असल्याची माहिती समोर येत आहे. जप्त केलेल्या फोन्समधील मोबाईल नंबर, सोशल मीडियावरील चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. जप्त केलेल्या मोबाईल फोन्समधून महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपासाला वेग येण्याची शक्यता जप्त केलेल्या मोबाईल फोन्सचा तपास पूर्ण झाल्यावर तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या NCBने आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी, ड्रग पेडलर्सची चौकशी केली आहे. सुशांतची  मैत्रिण रिया चक्रवर्तीला देखील अटक करण्यात आली होती. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती अद्यापही कोठडीमध्ये आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Actor, Bollywood, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या