काय आहे भाजपचे संदीप सिंह कनेक्शन? 177 कोटींच्या करारावरून सचिन सावंत यांनी पुन्हा केलं लक्ष्य

काय आहे भाजपचे संदीप सिंह कनेक्शन? 177 कोटींच्या करारावरून सचिन सावंत यांनी पुन्हा केलं लक्ष्य

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून भाजपवर टीका करणाऱ्या ट्वीटचे सत्र सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून भाजपवर टीका करणाऱ्या ट्वीटचे सत्र सुरू आहे. आज देखील त्यांनी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून गुजरात भाजपवर टिका केली आहे.

'भाजपच्या मर्जीतील मुलगा संदीप सिंह यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहारात 2017 साली 66 लाखाचे नुकसान झाले होते, 2018 साली साली 61 लाखाचा नफा, तर पुन्हा 2019 मध्ये 4 लाखाचे नुकसान झाले होते. 219 मध्ये गुजरात सीएम रूपानी यांनी संदीप सिंहसह 177 कोटींचा करार केला. हा पैसा कुठून येत होता?', असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

त्याला लागूनच सावंत यांनी दुसरे ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'मोदीजींचा बायोपिक करण्यास सहमती दर्शविण्याकरिता हा सामंजस्य करार होता? हे "टोकन अ‍ॅडव्हान्स" होते का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी संदीप सिंह याची निवड नेमक्या कोणत्या कारणासाठी केली?' अशाप्रकारे सचिन सावंत यांनी प्रश्नांची सरबत्ती करत भाजप नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान शनिवारी देखील सचिन सावंत यांनी काही ट्वीट्स करत संदीप सिंह, महाराष्ट्र भाजप आणि गुजरात भाजपवर टीका केली होती. त्यांनी भाजपवर निशाणा साधत असे म्हटले होते की, '1 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये संदीपने (मीडिया अहवालानुसार तो लंडनला पळून जाणार होता) महाराष्ट्र भाजप कार्यालयामध्ये केलेले 53 फोनकॉल्स कुणाला केले? तो कुणाशी बोलत होता? त्याचा भाजपमधील हँडलर कोण आहे?' या सर्व प्रकरणातील भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

(हे वाचा-SSR Case : 'संदीप सिंहने भाजप कार्यालयामध्ये 53 फोन कॉल्स कुणाला केले?')

संदीप सिंह हा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा निर्माता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संदीप सिंहचे फोटो आहेत. त्यामुळे संदीप सिंह यांचे भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. त्याचप्रमाणे सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे.

'संदीप सिंह यांचा भाजपशी काय संबंध आहे, ड्रग माफियांशी काय संबंध आहे, या संदर्भात निवेदन आलं आहे. ते निवेदन आम्ही सीबीआयकडे सोपवलं आहे. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत,' असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 30, 2020, 9:01 AM IST

ताज्या बातम्या