SSR Case: गौरव आर्य ईडीसमोर राहणार हजर, ड्रग डीलिंगबाबत धागेदोरे मिळण्याची शक्यता

SSR Case: गौरव आर्य ईडीसमोर राहणार हजर, ड्रग डीलिंगबाबत धागेदोरे मिळण्याची शक्यता

गौरव आर्य ईडी चौकशीकरता हजर राहणार आहे. गौरव हॉटेल व्यावसायिक असून तो अंमली पदार्थ तस्कर असल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. आज तो 4 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर उतरेल अशी सूत्रांची माहिती मिळते आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) सुरुवातील नेपोटिझम या मुद्द्याची चर्चा झाली. त्यानंतर मनी लाँड्रिंगचा अँगलही समोर आला होता. दरम्यान आता याप्रकरणी अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा समोर येत आहे. याप्रकरणी गौरव आर्य (Gaurab Arya) चे नाव वारंवार समोर येत आहे. नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार गौरव आर्य ईडी चौकशीकरता हजर राहणार आहे. गौरव हॉटेल व्यावसायिक असून तो अंमली पदार्थ तस्कर असल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. आज तो 4 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर उतरेल अशी सूत्रांची माहिती मिळते आहे. गौरवची उद्या सकाळी 11 वाजता ईडी चौकशी होणार आहे. त्याचप्रमाणे एनसीबी गौरव आर्यला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं  (Rhea Chakraborty) ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. यामध्ये रियाने तिच्या फोनवरून ज्या व्यक्तींशी मेसेजवरून ड्रग्जबाबत चर्चा केली होती. त्यापैकी एक म्हणजे गौरव आर्य आहे. गौरवचा रियाचा संपर्क झाला होता, असं म्हटले जातं आहे. मात्र गौरव आर्यने हे आरोप फेटाळले होते.

(हे वाचा-भाजपचे संदीप सिंह कनेक्शन? 'त्या' करारावरून सचिन सावंत यांनी पुन्हा केलं लक्ष्य)

दरम्यान रियाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील गौरव आर्यचा उल्लेख केला होता. गोव्याच्या रेस्टॉरंटचे मालक गौरव आर्य यांना संपर्क साधून ड्रगविषयी विचारणा करणाऱ्या कथित whatsapp चॅट बद्दल विचारण्यात आल्यावर रिया म्हणाली, "गौरव आर्य यांना मी ओळखते. पण त्याचा ड्रग्जशी काही संबंध नाही. आता नार्कोटिक्स डिपार्टमेंट याविषयी चौकशी करत आहे. त्यामुळे या विषयावर मी इथे काही बोलू शकत नाही."

(हे वाचा-रडत रियाने सांगितली तिची कहाणी, का म्हणाली-भट्ट सर त्याने मला घराबाहेर काढलं)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजे NCB ने रिया विरुद्ध FIR दाखल केली असून त्या दिशेनं तपास सुरू झाला आहे. रियाने ज्या गौरव आर्यशी व्हॉट्सअॅपवर ड्रग्जबाबत चर्चा केली होती. गौरव आर्य हा गोव्यातील एका रेस्टॉरंटचा मालक असून अंजुना बीचवर हे रेस्टॉरंट आहे, अशी माहिती समोर आली होती.  या रेस्टॉरंटमध्ये एनसीबीच्या टीमने तपास केला. काही मीडिया अहवालांच्या मते तो त्याठिकाणी सापडला नाही. त्याचप्रमाणे ईडीची टीम देखील त्याला समन बजावण्यासाठी अंजुना स्थित हॉटेलमध्ये पोहोचली होती, मात्र तो तिथे सापडला नाही. टीमने हॉटेलबाहेर नोटीस लावून त्याला 31 ऑगस्टपर्यंत मुंबई कार्यालयात पोहोचण्याची नोटीस बजावली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 30, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या