• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची उद्या चौकशी; गुन्हा सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची उद्या चौकशी; गुन्हा सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

SSR case च्या निमित्ताने ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींची नावं आता येत आहेत. अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नेमकी काय शिक्षा होऊ शकते?

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR case) याच्या मृत्यूप्रकरणाचा ड्रग्सची संबंधी आहे का हे शोधताना बॉलिवूड आणि ड्रग्ज यातील धक्कादायक समीकरण समोर येत आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींवर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सारा अली खान (Sara ali khan, shraddha kapoor) यांना समन्स जारी केलं आहे. दीपिकाची उद्या चौकशी होणार आहे. दुसरीकडे शर्लीन चोप्राने (sherlyn chopra) खळबळजनक आरोप करत अनेक क्रिकेटपटूंच्या बायका आणि बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात आपण त्यांची नावं सांगू शकतो असं म्हटलं आहे. अशा स्थितीत अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नेमकी काय शिक्षा होऊ शकते? ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झाल्यास 'ही' होते शिक्षा सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआय तपास सुरू झाल्यानंतर एक-एक गोष्टी उघड होत गेल्या आणि नंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड झालं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही  (एनसीबी) या प्रकरणात सीबीआयसोबत तपास करीत आहे़. रिया चक्रवर्तीनंतर आता दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत कौर यांची नावं पुढं आली  आहेत. कायदा काय सांगतो काय होऊ शकते शिक्षा? भारतात अंमली पदार्थ सेवन किंवा बाळगणं बेकायदेशीर असून, या प्रकरणात दोन कायद्यान्वये शिक्षा होऊ शकते़. त्यात Narcotic Drugs and Psychotropic Substances Act NDPS 1985 आणि NDPS 1988 या कायद्यानुसार ड्रग किंवा कोणत्याही मादक रसायनं किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचं उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी, आयात -निर्यात किंंवा वापरावर प्रतिबंध आहे़. केवळ वैद्यकीय कारणास्तव परवानगी असते़ या प्रतिबंधाचे उल्लंघन केल्यास संबधित व्यक्तीच्या चौकशी व अटकेचीही या कायद्यात तरतूद आहे़. तपास यंत्रणा यात सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रात किंवा स्थानांवर कारवाई करू शकतात, तसे अधिकार त्यांना प्राप्त असतात़. घटनेतील कलम 47 नुसार राज्य सरकारला अंमली पदार्थ नियंत्रण व त्यावर बंदी घालण्याचे अधिकार मिळतात. ड्रग्जची तीन श्रेणींमध्ये विभागणी होते, एक म्हणजे LSD, मेथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, दुसरी श्रेणी चरस, गांजा, अफिम आणि तिसरी म्हणजे केमिकल्स - ज्यांना कंट्रोल्ड सबस्टन्सही म्हटलं जातं. कोकेन, गांजा यासह सायकोट्रॉपिक पदार्थ असे 215 पेक्षा अधिक प्रकार NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंधित आहेत. यातील कुठलाही प्रकारचा पदार्थ जवळ बाळगणं, देवाण-घेवाण करणं, व्यापार करणं हा कायद्याने गुन्हा असून तुम्ही तसं केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कायद्याचं किती प्रमाणात उल्लंघन केलं आहे, यावर शिक्षा ठरते. कमीत कमी 10 वर्षं शिक्षा एक किलोपेक्षा कमी ड्रग आढळल्यास खासगी वापरासाठी असेल तर आरोपीला 10 वर्षं तर व्यावसायिक वापरासाठी असेल तर  20 वर्षं शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय बदलून ड्रगच्या प्रमाणावर शिक्षा ठरवता येणार नाही, असं म्हटले आहे़ त्यानुसार 10 ते 20 वर्षांपर्यंतची शिक्षा व कमीत कमी एक लाख रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मृत्युदंडही शक्य 2004 मध्ये 142  किलो हशीश बाळगणाऱ्या गुलाम मलिक याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने मृत्यूची शिक्षा सुनावली होती. 1998 मध्ये 40 किलो चरस आणि 2003 मध्ये 28 किलो चरससोबत अटक झालेल्या ओंकरनाथ काक यालाही अहमदाबाद सत्र न्यायालयानी फाशीची शिक्षा दिली होती.  तसंच चंडीगढ जिल्हा न्यायालयाने परमजित सिंह याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्याकडे 1998 मध्ये एक किलो आणि 2007 मध्ये 10 किलो हेरॉईन सापडलं होतं. ड्रगच्या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलीस सविस्तर तपास करत मात्र, या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल डिव्हिजन, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, सीबीआय, डीआरआय, कस्टम कमीशन, बीएसएफ यांनाही कारवाईचे अधिकार आहेत़.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: