दीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग

दीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग

इटलीला लग्नासाठी शाहरुख खान, फराह, संजय लीला भन्साळी लग्नसोहळ्याला उपस्थित आहेत. अशा वेळी शाहरुखनं आपल्या झीरो सिनेमाचं प्रमोशनही करून घेतलं.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : रणवीर-दीपिकाचं लग्न एकदमच सिक्रेट ठेवलं. लग्नाला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाते. इटलीला लग्नासाठी शाहरुख खान, फराह, संजय लीला भन्साळी लग्नसोहळ्याला उपस्थित आहेत. अशा वेळी शाहरुखनं आपल्या झीरो सिनेमाचं प्रमोशनही करून घेतलं.

लग्न आणि कालचा बालदिन मिळून शाहरुखनं ट्विट केलंय. त्या सिनेमातला अभिनेता मोहम्मद झीशन आयुबनं झीरोच्या बऊआ सिंगला हॅपी चिल्ड्रेन डे केलंय. त्यावर बऊआनं थँक्स म्हटलंय. नंतर झीशननं लिहिलंय, तुझी उंची तर कमीच आहे. पण वयही कमी करायचंय का?

त्यावर हजरजबाबी बऊआनं उत्तर दिलं, दीपिकानं लग्न केल्यानंतर तर आता 'उम्रही खत्म हो गयी' असं ट्विट करून किंग खाननं झीरोचं प्रमोशन केलं.

चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झिरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात शाहरुखने बऊआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बऊआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

PHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा!

First published: November 15, 2018, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading