...आणि शाहरुख भयंकर चिडला

या शोची होस्ट असणारी एक महिला चिखलामध्ये पडते. आणि त्यानंतर एक मगरीसारखा प्राणी तिच्यावर हल्ला करण्यासाठी येतो. हे पाहताच शाहरुख त्या महिला होस्टला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2017 03:25 PM IST

...आणि शाहरुख भयंकर चिडला

05 जून : दुबईतील एका शोमध्ये शाहरुख शोच्या अँकरवर भडकल्याचं पहायला मिळालं. खरं तर रमीज अंडरग्राउंड या दुबईतील एका शोमध्ये शाहरुख सहभागी झाला होता. त्यामध्ये या शोची होस्ट असणारी एक महिला चिखलामध्ये पडते. आणि त्यानंतर एक मगरीसारखा  प्राणी तिच्यावर हल्ला करण्यासाठी येतो. हे पाहताच शाहरुख त्या महिला होस्टला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

परंतु हा सगळा एक प्रँक होता, जो शाहरुखसाठी केला गेला होता. हा प्रँक असल्याचं उघड झाल्यानंतर प्राण्याच्या वेशातील माणूस बाहेर येतो.ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसते तर त्या शोचा अँकरच असतो. हे सगळं प्रकरण कळल्यानंतर शाहरुख प्रचंड  संतापतो.

हा प्रँक करणाऱ्या अँकरला मग 'अँग्री शाहरूख' चं दर्शन घडते. तो अँकर सतत शाहरुखला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतो की, 'तो शाहरुखवर किती प्रेम करतो.' मात्र शाहरूख  त्याचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. शेवटी शाहरुख त्या अँकरला हा शोच बंद करायला सांगतो.

आज अनेक शोज मध्ये अशा प्रकारचे प्रँक पहायला मिळतात. परंतु यावेळी मात्र शाहरुखच्या रागामुळे त्या अँकरचा असा प्रयत्न फसला, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...