सरप्राईझ! 'झीरो'मध्ये श्रीदेवी दिसणार 'या' रूपात

सरप्राईझ! 'झीरो'मध्ये श्रीदेवी दिसणार 'या' रूपात

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, राणी मुखर्जी, काजोल, जूही चावला, आलिया भट्ट, करिश्मा कपूर आणि सलमान खान झीरो सिनेमात गेस्ट म्हणून आहेत. आता एक चांगली बातमी आलीय.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : शाहरुख खानच्या झीरो सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. त्यातल्या एकेक गोष्टी आता बाहेर यायला लागल्यात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, राणी मुखर्जी, काजोल, जूही चावला, आलिया भट्ट, करिश्मा कपूर आणि सलमान खान झीरो सिनेमात गेस्ट म्हणून आहेत. आता एक चांगली बातमी आलीय.


सिनेमात श्रीदेवी आहे, हे आपल्याला कळलं होतं. पण खास बात अशी की, सिनेमात श्रीदेवी आणि शाहरुख खानचं एक गाणं आहे. त्यात करिष्मा कपूर आणि आलियाही आहेत. श्रीदेवीचा हा शेवटचा सिनेमा ठरलाय.


आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झीरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.


चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.


दीपवीरचं आज मुंबईत रिसेप्शन,या आहेत खास गोष्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 10:40 AM IST

ताज्या बातम्या