श्रीदेवी यांच्या जीवनप्रवासाला एक नवं वळण, उलगडणार सर्व रहस्य?

श्रीदेवी यांचं फेब्रुवारी 2018 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. अशाप्रकारची त्यांची अचानक एक्झिट चाहतेच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीच्या मनाला चटका लावून गेली.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 09:42 AM IST

श्रीदेवी यांच्या जीवनप्रवासाला एक नवं वळण, उलगडणार सर्व रहस्य?

मुंबई, 17 ऑगस्ट : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्यावर पेंग्विन हाउस इंडिया एक पुस्तक प्रकाशित करणार आहे. याची घोषणा पेंग्विन रॅन्डम हाउस इंडियानं नुकतीच केली. ‘श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार’(sridevi : girl woman superstar) असं या पुस्तकाचं नाव असून याचे लेखक सत्यार्थ नायक आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाला श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी परवानगी सुद्धा दिली आहे.

पेंग्विन प्रकाशनानं दिलेल्या माहितीनुसार या पुस्तकात श्रीदेवी यांचं जीवन आणि त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यात येणार आहे. श्रीदेवी अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी पुरुषप्रधान सिनेसृष्टीला दाखवून दिलं की एक महिला कशाप्रकारे या क्षेत्रीत स्वतःचं वेगळण स्थान निर्माण करू शकते. हे पुस्तक ऑक्टोबर 2019 मध्ये पेंग्विन रॅन्डम हाउसच्या ईबरी प्रेसच्या अंतर्गत प्रकाशित केलं जाईल. ई-कॉमर्स वेबसाइटवर हे पुस्तक सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

चिपळूण शहरात शिरली 8 फुटांची मगर, पकडण्याचा LIVE VIDEO

लेखक सत्यार्थ या पुस्तक विषयी बोलताना म्हणाले, ‘मी नेहमीच श्रीदेवी यांचा खूप मोठा चाहता आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मला भारतातील सिनेमसृष्टीच्या एका प्रतिभावान कलाकराचा जीवनप्रवास शब्दात मांडायची संधी मिळाली.’ सत्यार्थ पुढे म्हणाला, ‘या संदर्भात सिने इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. ज्या लोकांनी एवढी वर्ष त्यांच्या सोबत काम केलं त्या सर्वांनीच त्याच्यासोबतचे आपापले अनुभव आणि आठवणी माझ्यासोबत शेअर केल्या. या पुस्तकात एक बालकलाकार ते सिने सृष्टीतील एक महिला सुपरस्टार पर्यंतचा श्रीदेवींचा प्रवास मांडण्यात आला आहे.’

Laal Kaptaan Teaser : सेक्रेड गेम्सनंतर सैफ नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला

Loading...

श्रीदेवी यांचं फेब्रुवारी 2018 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. दुबईमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला त्या गेल्या होत्या आणि त्याठीकाणी हॉटेल मधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा अकस्मित मृत्यू झाला. अशाप्रकारे त्यांनी अचानक घेतलेली एक्झिट चाहतेच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या मुलीचं सिनेसृष्टीतील पदर्पण पाहण्याची त्यांची इच्छा अखेर अपुरीच राहिली.

आशा भोसलेंनी पाकिस्तानला असं केलं ट्रोल, नेटकरी झाले खूश

==================================================================

SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...