मुंबई, 29 मार्च- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आपल्यात आज नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहे. श्रीदेवी बॉलिवूड जगतातील एक मोठं नीव होतं आणि राहिल. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भूमिका कोणतीही असो पडद्यावर ती उत्तम साकारणासाठी श्रीदेवी या जीवाचं रान करत होत्या. त्यांच्या सिनेमासंबंधी असाच एक किस्सा आहे,जो वाचल्यानंतर तुम्ही देखील श्रीदेवी यांना सलाम कराल एवढं मात्र नक्की आहे.
श्रीदेवी यांच्या 'मॉम' या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा आहे. या चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा सर्वांना चकीत केले. 'मॉम'च्या ट्रेलर रिलीजदरम्यान श्रीदेवी यांनी एक असा खुलासा केला होता, ज्यामुळे तिथे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी श्रीदेवी यांनी सांगितले होते की, 'मॉम' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी पती आणि निर्माते बोनी कपूर यांच्याशी 3 महिने बोलल्या नव्हत्या.
वाचा-'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
श्रीदेवी या त्यावेळी सिनेमातील भूमिकेची तयारी करत होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी फक्त बोनी कपूर यांना रोज सकाळी ‘गुड मॉर्निंग’ आणि पॅकअप झालं की ‘गुड इव्हनिंग म्हणतं होते. तीन महिने त्यांचं बोनी कपूर यांच्यासोबत फक्त एवढचं बोलणं होत असत्याचे त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्या म्हणाल्या देखील होत्या की, मी “मैं डायरेक्टर की एक्टर हूं..म्हणजे दिग्दर्शकांने तयार केलेली मी कलाकार आहे. म्हणजे मी माझ्या प्रत्येक सिनेमात दिग्दर्शकाच्या मर्जीनं काम करते. त्याला जसं हवं तशा साच्यात मी काम करण्याचा प्रयत्न करते. मॉम सिनेमात देखील त्यांनी दिग्दर्शकाच्या प्रत्येक सुचेनेचं पालन केलं आणि सिनेमा यशस्वी झाला.
2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मॉम' या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर होते. या चित्रपटात श्रीदेवी एका अशा आईच्या भूमिकेत दिसल्या होती जी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होती. या चित्रपटात सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
बोनी कपूर यांनी 1996 मध्ये श्रीदेवीसोबत दुसरे लग्न केले होते. बोनी कपूर यांनी श्रीदेवीला पहिल्यांदा एका तमिळ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पाहिलं होतं. त्यानंतर 'मिस्टर इंडिया'च्या सेटवर या दोघांची भेट झाली. या चित्रपटात श्रीदेवी बोनी कपूर यांचा लहान भाऊ अनिल कपूरसोबत दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment