Home /News /entertainment /

श्रीदेवी यांच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर, खोटे ठरले सर्व दावे...

श्रीदेवी यांच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर, खोटे ठरले सर्व दावे...

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. पण आता त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.

  मुंबई, 05 जानेवारी : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला हे सर्वांनाच माहित आहे. पण त्यानंतर त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. पण आता त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे. श्रीदेवींच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘श्रीदेवी : द एटर्नल गॉडेस’ मध्ये लेखक सत्यार्थ नायक यांनी लिहिलं आहे की, श्रीदेवी नेहमीच ब्लड प्रेशरमध्ये बेशुद्ध होत असत. या संदर्भात त्यांनी श्रीदेवी यांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या वक्तव्यांचाही समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नायक यांनी सांगितलं, मी पंकज पाराशर (ज्यांनी श्रीदेवी यांच्या चालबाज या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.) आणि नागार्जुन यांना भेटलो. त्या दोघांनीही मला सांगितलं की श्रीदेवी यांनी रक्तदाबाची समस्या होती. ज्यावेळी श्रीदेवींनी या दोघांसोबत काम केलं होतं त्यावेळीही त्या अनेकदा अशाचप्रकारे बाथरुममध्ये बेशुद्ध झाल्या होत्या. याशिवाय मी याबाबत श्रीदेवींची पुतणी माहेश्वरी हिच्याशी सुद्धा बोललो.
  View this post on Instagram

  💕

  A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

  माहेश्वरीनं सांगितलं की तिनं एकदा श्रीदेवींना फरशीवर पडलेलं पाहिलं होतं आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होतं. बोनी कपूर यांनीही सांगितलं की, एकदा चलता चलता श्रीदेवी अचानक खाली पडल्या होत्या. नायक यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणं श्रीदेवी बऱ्याच काळापासून कमी रक्तदाबाच्या समस्येशी झुंजत होत्या. पण त्याआधी केरळमधील एका DGPनं म्हटलं होतं की श्रीदेवी यांचा मृत्यू ही एक दुर्घटना नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला होता.
  View this post on Instagram

  ❤️❤️❤️❤️

  A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

  सूत्रांच्या माहितीनुसार श्रीदेवी यांचा दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याचे पती बोनी कपूर यांना त्या मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूविषयी अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या. त्यानंतर लेखक सत्यार्थ नायक यांनी त्यांच्या पुस्तकात या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला आहे. 24 फेब्रुवारी 2018मध्ये श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. चांदणी सिनेमात आपल्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या श्रीदेवी यांच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांना मोठा धक्का बसला हाता.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sridevi

  पुढील बातम्या