Sridevi Death Anniversary : आईच्या आठवणीत भावूक झाली जान्हवी कपूर

Sridevi Death Anniversary : आईच्या आठवणीत भावूक झाली जान्हवी कपूर

बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. 2 वर्षांपूर्वी या बातमीने संपूर्ण बॉलीवूड तसंच श्रीदेवी यांच्या चाहतावर्गावर शोककळा पसरली होती

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. 2 वर्षांपूर्वी या बातमीने संपूर्ण बॉलीवूड तसंच श्रीदेवी यांच्या चाहतावर्गावर शोककळा पसरली होती. 2 वर्षानंतरही ही घटना अनेकजण विसरु शकत नाही आहेत. श्रीदेवींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावली होती. 54 वर्षांच्या असताना 2018 मध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला. चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी त्यांची पहिली पत्नी मोना यांना घटस्फोट देऊन श्रीदेवींबरोबर 1996मध्ये लग्न केलं होतं. कोणालाही भुरळ घालेल असं सौंदर्य असणाऱ्या श्रीदेवींवर बोनी कपूर यांचं प्रेम जडलं होतं.  इम्प्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मिस्टर इंडियासाठी श्रीदेंवींनी मागितली तेवढी रक्कम दिली होती. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान दिली होती. याच दरम्यान श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअरच्या देखील चर्चा होत्या. पण शेवटी बोनी कपूर यांचं प्रेम जिंकलं आणि त्यांनी 1996 मध्ये लग्न केलं.

(हेही वाचा- Death Anniversary: पती बोनी कपूर यांच्याशी 'या' कारणावरुन भांडायच्या श्रीदेवी)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला, मात्र त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण श्रीदेवींच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘श्रीदेवी : द एटर्नल गॉडेस’ यामधून लेखक सत्यार्थ नायक यांनी श्रीदेवींच्या मृत्यूचं गुढ उकलण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, श्रीदेवींना रक्तदाबाचा त्रास होता. त्या नेहमीच ब्लड प्रेशरमध्ये बेशुद्ध होत असत. या संदर्भात त्यांनी श्रीदेवी यांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या वक्तव्यांचाही समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नायक यांनी सांगितलं, 'मी पंकज पाराशर (ज्यांनी श्रीदेवी यांच्या चालबाज या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं) आणि नागार्जुन यांना भेटलो. त्या दोघांनीही मला सांगितलं की श्रीदेवी यांनी रक्तदाबाची समस्या होती. श्रीदेवींचे पती बोनी कपूर आणि त्यांचा पुतणी माहेश्वरी यांनी सुद्धा त्यांच्या रक्तदाबाच्या समस्येविषयी नायक यांना सांगितलं होतं. ' पण त्याआधी केरळमधील एका DGPनं म्हटलं होतं की श्रीदेवी यांचा मृत्यू ही एक दुर्घटना नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

सूत्रांच्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2018ला श्रीदेवी यांचा दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याचे पती बोनी कपूर यांना त्या मृतावस्थेत आढळल्या.  श्रीदेवींची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत श्रीदेंवींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जान्हवीने तिच्या बालपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला जान्हवीने 'Miss You Everyday' अशी कॅप्शन दिली आहे. जान्हवीच्या या फोटोवर अनेक सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी कमेंट केली आहे. आपल्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या श्रीदेवी यांच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता आणि आजही त्यांची उणीव सर्वांनाच भासते आहे.

First published: February 24, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading