S M L

आपल्या चार मुलांबद्दल पप्पा बोनी कपूर काय म्हणतायत?

हल्ली तुमच्या एक लक्षात आलंय का? जान्हवी कपूरचा कुठलाही इव्हेंट असो खुशीसोबत अर्जुन आणि अंशुला हजर असतातच.

Sonali Deshpande | Updated On: Jul 27, 2018 06:48 AM IST

आपल्या चार मुलांबद्दल पप्पा बोनी कपूर काय म्हणतायत?

मुंबई, 27 जुलै : हल्ली तुमच्या एक लक्षात आलंय का? जान्हवी कपूरचा कुठलाही इव्हेंट असो खुशीसोबत अर्जुन आणि अंशुला हजर असतातच. चौघं भावंडं हल्ली बराच वेळ एकत्र घालवतात. श्रीदेवींच्या अचानक निधनानंतर जान्हवी, खुशी, अंशुला आणि अर्जुन कपूर हे चौघे भाऊबहीण एकत्र आले आहेत. ते एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. अर्जुन आणि अंशुला या दोघांनी जान्हवीचा वाढदिवसही एकत्र साजरा केला होता.  या दोघांनी जान्हवीचा पहिला चित्रपट धडकच्या ट्रेलर लाँचवेळीही सगळे उपस्थित होते.  यावर्षी नुसता जान्हवीचाच नाही तर अर्जुनचा वाढदिवस देखील एकत्र साजरा करण्यात आला. तसंच त्यांची चुलत बहीण सोनम कपूरच्या लग्न सोहळ्यातही या चौघांनी  फॅमेली फोटोसाठी पोज दिली.

1996 मध्ये जेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं तेव्हा अंशुला आणि अर्जुन त्यांच्यावर चिडले होते. आणि यामुळे या दोघांनी त्यांच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी यांच्यापासून लांब राहणंच पसंत केलं. त्यावेळी अर्जुन कपूर एका मुलाखतीत म्हणाला होता, श्रीदेवी माझ्या वडिलांची बायको आहे. बस्स, बाकी माझा संबंध नाही.

आता श्रीदेवींच्या निधनानंतर हे चौघे एकत्र आले आहेत. यावर बोनी कपूर यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणतात की, ‘हे चौघे भाऊबहीण एकत्र आल्यामुळे मी खूप आनंदी आहे. हे कधी ना कधी घडणारच होतं. पण या अशा निमित्ताने घडणं हे अपेक्षित नव्हतं. या चौघांच्यातही माझंच रक्त आहे, त्यामुळे त्यांनी एकत्र येणं हे माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.’त्यानंतर या चौघांच्यात त्यांचा मोठा भाऊ किती समंजस आहे हे यावेळी त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, ‘या सगळ्याचं श्रेय मी सर्वांनाच देईन पण त्यांचा मोठा भाऊ सगळ्यांच्यात समंजस आहे. तो माझी साथ देण्यासाठी दुबईला पोहोचला, आणि अंशुला जान्हवी आणि खुशीसोबत मुंबईत होती. त्यांच्या आई जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या दोघींच्या निधनानंतर त्यांच्या बापाचीच त्यांना गरज आहे आणि मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभा आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2018 06:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close