'मोग्यांबो खूश हुआ', 'मिस्टर इंडिया' पुन्हा येतोय भेटीला

'मोग्यांबो खूश हुआ', 'मिस्टर इंडिया' पुन्हा येतोय भेटीला

विशेष म्हणजे या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी दोघही पुन्हा एकत्र येणारेत.

  • Share this:

19 जून : 1987 साली भारतीयांची मनं जिंकणाऱ्या मिस्टर इंडियाचा दुसरा भाग रिलीज होतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी दोघही पुन्हा एकत्र येणारेत. सध्या तरी दोघंही वेगवेगळ्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या सुरू असलेले शुटिंग संपल्यावर  ते या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करतील.

या सिनेमात या दोघांशिवाय अजून एक जोडी असणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाचा सिक्वेल खूप आधीच बनवायचा होता. पण ते एका चांगल्या कथानकाच्या शोधात होते. आता ते मिळालंय. यात पहिल्या भागाचीच कथा पुढे कन्टिन्यू होणार आहे.

पण चित्रपटाचे दिग्दर्शक  शेखर कपुरनं या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला नकार दिलाय. अजून तरी नवा दिग्दर्शक कोण होणार हे गुलदस्त्यातच आहे. पण तरीही राकेश ओमप्रकाश मेहरा आणि रवी उड्यारची नाव चर्चेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 06:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading