मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Spruha Joshi : 'तुम्ही दहा वर्षांनंतरही...'; स्पृहाच्या थ्रोबॅक व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Spruha Joshi : 'तुम्ही दहा वर्षांनंतरही...'; स्पृहाच्या थ्रोबॅक व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Spruha Joshi

Spruha Joshi

मागील दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी साजरी करण्यावर बंधनं होती. पण या वर्ष कुठल्याही नियमांशिवाय दहीहंडी साजरी होताना दिसत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांमध्ये देखील या सणांचा उत्साह पाहायला मिळतोय.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 19 ऑगस्ट : सध्या श्रावण सणांची सगळीकडे लगबग आहेत. सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे  केले जातायत.  आता आज  दहीहंडी हा सणसगळीकडे उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी साजरी करण्यावर बंधनं  होती. पण या वर्ष कुठल्याही नियमांशिवाय दहीहंडी साजरी होताना दिसत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांमध्ये देखील या सणांचा उत्साह पाहायला मिळतोय. कलाकार आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना हा सणांच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी हिनेसुद्धा चाहत्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण तिच्या या पोस्टवर एका चाहत्यानी  केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा अनेक भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजेच स्पृहा जोशी. स्पृहा अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या निखळ हास्य आणि दमदार अभिनयामुळे ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच स्वत: केलेल्या कवितांनी ती  प्रेक्षकांची मनं जिंकते. स्पृहा जोशी सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. ती  तिचे फोटो चात्यांसोबत शेअर करत असते. आज स्पृहाने दहिहंडीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या 'मोरया' चित्रपटातील 'गोविंदा रे गोपाळा' या गाण्याचा शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये अभिनेता संतोष जुवेकर आणि ती या गाण्यावर  डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत भरभरून प्रतिसाद दिला आहे. पण एका चाहत्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. तो म्हणतोय कि, 'हा व्हिडीओ बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. शाळेच्या गॅदरिंग मध्ये आमचा या गाण्यावर डान्स होता. दहा वर्षांनंतर या आठवणींना उजाळा मिळाला.  स्पृहा मॅम  तुम्ही दहा वर्षांनंतर अजूनही तेवढ्याच सुंदर दिसता, ही  विशेष बाब आहे.' अशा शब्दात चाहत्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Bharat Jadhav and Kranti Redkar : तब्बल 16 वर्षांनी कोंबडी पळालीच्या तालावर भरत आणि क्रांतीने पुन्हा धरला ठेका; पाहा व्हिडीओ स्पृहाचा 'मोरया' हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता एवढ्या वर्षांनंतरही  स्पृहाचं  या चित्रपटातील भूमिकेसाठी चाहत्यांकडून कौतुक होत आहे. स्पृहा सध्या 'सूर नवा ध्यास नवा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिचं युट्युब चॅनेलही जोरात सुरु आहे.  नुकतेच तिच्या चॅनलवर १ लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. तिचं कौतुक म्हणून युट्यूबकडून तिला 'सिल्वर बटन' देण्यात आलं आहे.  आता स्पृहाला नवीन रूपात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या