अभिनेत्री स्पृहा जोशीच्या घरी आले बाप्पा, गणेशमूर्ती 'या' कारणामुळे आहे खास

'दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी स्पृहानं की आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची असं ठरवलं होते. .

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 04:40 PM IST

अभिनेत्री स्पृहा जोशीच्या घरी आले बाप्पा, गणेशमूर्ती 'या' कारणामुळे आहे खास

मुंबई, 2 सप्टेंबर : अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामूळे जर गावी जाता नाही आले, तर मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण ती मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रिगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या ह्या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.

ट्रि-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर स्पृहा जोशी म्हणाली, 'दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५व्या दिवशी त्यातून छान रोपटे तरारून येणार आहे. मला हि कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलंय कि आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून हि नवीन सुरवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची हि सगळ्यात सुंदर पद्धत आहे."

तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींच्या बाप्पांचे फोटो पाहा एका क्लिकवर!

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

स्पृहा पुढे सांगते, 'कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्या घरापासूनच होते. त्यामूळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशापध्दतीने सुरू करण्याची आता गरज आहे.'

'बिग बॉस मराठी 2'च्या बक्षिसाच्या रक्कमेचं काय करणार? शिवनं दिलं हे उत्तर

काय आहे ट्री गणेश

ट्री गणेश ही एक पर्यावरण पुरक गणेश मूर्तीची संकल्पना आहे. ही मूर्ती तयार करत असताना याच्या आत बिया टाकल्या जातात. तसेच या मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाणारी माती सुद्धा एखाद्या रोपट्यासाठी पुरक अशीच असते. या गणेश मूर्तीची स्थापना एका कुंडीत केली जाते. त्यानंतर या मूर्तीचं विसर्जन या कुंडीत मूर्तीवर पाणी ओतून केली जाते. अशाप्रकारे 15 दिवस त्यात पाणी ओतल्यानंतर त्या कुंडीत एक रोप उगवतं.

पती निक जोनससोबत प्रियांका पोहोचली हॉस्पिटलमध्ये, हे आहे कारण

=======================================================

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...