मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्पृहा जोशी-सिद्धार्थ चांदेकरची कॉफी विथ केमिस्ट्री चर्चेत ; टीझर पाहिला का?

स्पृहा जोशी-सिद्धार्थ चांदेकरची कॉफी विथ केमिस्ट्री चर्चेत ; टीझर पाहिला का?

प्रेमाची तजेलदार ‘कॉफी’ घेऊन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी 14 जानेवारीला सिनेमागृहात येत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

  ेजमुंबई, 28 डिसेंबर -  प्रेमाची तजेलदार ‘कॉफी’  (coffee)घेऊन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी 14 जानेवारीला सिनेमागृहात येत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज (coffee teaser out)  झाला आहे. या सिनेमातील स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरची जबरदस्त केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे. स्पृहा जोशी टीझर रिलीज करत म्हटले आहे की, प्रेम हे कॉफीसारखं असतं. थोडं गोड थोडं कडवट. पण प्रत्येक क्षणात मजा आहे. टीझर रिलीज झालाय. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.14 जानेवारीला नक्की बघा #कॉफी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.स्पृहा जोश आणि सिद्धार्थ चांदेकरला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. यासोबतच त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी देखील चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

  ‘तन्वी’ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. तर कैलास सोरारी आणि विमला सोरारी या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची आहे. संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे. छायांकन आय गिरिधरन यांनी केले आहे. गीते अशोक बागवे, नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. संगीत तृप्ती चव्हाण यांचे आहे. कलादिग्दर्शन हरीश आईर यांचे आहे. कार्यकारी निर्माते संजय कांबळे आहेत. वाचा-In Pics : 'Pushpa'च्या सक्सेस पार्टीत Rashmika Mandanna चा ग्लॅमरस लूक कॉफीसोबत अनेकांच्या प्रेमळ आठवणी जोडलेल्या असतात. अनेकांचे प्रेम तर या कॉफीमुळेच जुळले आहे. पण ही प्रेमाची कॉफी जितकी गोड आणि तितकीच कडवट देखील आहे. या सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर देखील याचीच जाणीव होते. त्यामुळे या सिनेमाची कथा काहीसी प्रेमाच्या कॉफीभोवती फिरताना दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या