मुंबई, 21 मार्च : बॉलिवूड सिनेमा असो किंवा मराठी सिनेमा अनेक वर्ष इंडस्ट्रीनं प्रेक्षकांना अनेक हिट सिनेमांबरोबरच अनेक गाणी देखील दिली आहे. सिनेमातील केवळ गाणी ऐकण्यासाठी प्रेक्षक आधी सिनेमा पाहण्यासाठी जात होते. परंतु काळ बदलला आणि सिनेमातील गाणी एका क्लिकवर आपल्या फोनमध्ये येऊ लागली. सिनेमातील गाणी ऐकण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी अनेक अॅप्स आणि वेब साईट्स आहेत. त्यातील एक प्रसिद्ध म्युझिक स्ट्रिमिंग अॅप म्हणजेच स्पॉटिफाय( Spotify). बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी आपल्याला Spotifyवर ऐकायला मिळत होती. मात्र Spotify युझर्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. Spotifyवरील अनेक हिट गाणी काढून टाकण्यात आली आहे. अॅपवर बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी दिसत नसल्याचं समोर आलं आहे. नियमित Spotifyवापरणाऱ्या युझर्सनी याबद्दल सोशल मीडियावर तक्रार केली आहे.
प्रसिद्ध म्युझिक स्ट्रिमिंग अॅप असलेल्या Spotifyवर हिंदी तसेच मराठीतील अनेक सुपरहिट गाणी उपलब्ध आहेत. अनेक वर्ष युझर्स हे अॅप वापरत आहेत. अनेकांचा दिवस या अॅपवर गाणी ऐकत सुरू होतो. पण कंपनीनं नुकतीच त्यांच्या अँपवरून बॉलिवूडची हिंदी गाणी काढल्याचं सांगितलं आहे. म्युझिक कंपन्यांनी अॅग्रीमेंट न होऊ शकल्यानं अनेक हिट गाणी Spotifyवर उपलब्ध नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - जितेंद्र आणि हेमा मालिनीचं लग्न होता होता राहिलं; धर्मेंद्रनी भर मांडवात केला होता तमाशा
ऑडिओ स्ट्रिमिंग आणि बॉलिवूडच्या गाण्यांचं कॉपी राईट्स मिळण्यात कंपनीला मोठं अपयश आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाजीराव मस्तानी या प्रसिद्ध सिनेमातील मल्हारी हे गाणं, बार बार देखो सिनेमातील काला चष्मा सारखी अनेक प्रसिद्ध गाणी Spotifyवरून काढून टाकण्यात आली आहेत. Spotify नं त्यांच्या वेब साईटवर सांगितलं आहे की, जगातील सगळ्या म्युझिक्स, गाणी ते पॉडकास्ट करून शकत नाही. यासाठी पब्लिशर आणि लायसेंस होलर्ड्ससह अॅग्रीमेंट करणं गरजेचं असतं. भारतातील सर्वात मोठी एंटरेटेंनमेन्ट कंपनी असलेल्या झी म्युझिकबरोबर साँगक्रिएटिव्ह सोल्युशन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Many song albums like Kedarnath, Bhediya and Kalank which were produced by zee music have been removed from Spotify. I am sad as I am spotify user and happy because I am Zeel share investor.
— Abhi Khatri (@AbhiiKhatri) March 20, 2023
Spotifyवरून हिट गाणी काढून टाकल्यानं अनेक युझर्स कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे युझर्सना अॅपमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी कंपनीनं या महिन्यात टिकटॉक आणि युट्यूबरून नवीन फिड जोडलं आहे. हा बदल Spotifyच्या क्लासिक साँग्स आणि अल्बम क्रिएशनच्या ऐवजी पॉडकास्टसारख्या कंटेटची नवीन कॅटेगिरी डेव्हलप करत आहे.
Spotify हा ऑनलाइन म्युझिक प्लॅटफॉर्म 2008मध्ये लाँच झाला. यावर हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, पंजाबी सारख्या विविध भाषांमध्ये युझर्स गाणी ऐकू शकतात. यात युझर्स आपली प्ले लिस्ट देखील तयार करू शकतात. त्याचप्रमाणे गाणी डाऊनलोड देखील करता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Social media