टायगर माझ्याहून चांगला डान्सर-स्पायडरमॅन

टायगर माझ्याहून चांगला डान्सर-स्पायडरमॅन

स्पायडरमॅन 7 जुलैला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमामधल्या 'स्पायडरमॅन'ला हिंदीत आवाज दिलाय टायगर श्रॉफने.

  • Share this:

05जुलै : जगाला आपल्या 'वेब'च्या जाळ्यात अडकवणारा स्पायडरमॅन 7 जुलैला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमामधल्या 'स्पायडरमॅन'ला हिंदीत आवाज दिलाय टायगर श्रॉफने. स्पायडरमॅनची भूमिका करणारा टॉम हॉलंड टायगरच्या नृत्यानं भारावून गेलाय.

टीम आर्यन मॅनच्या भूमिकेतून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा टॉम 'स्पायडरमॅन:होम कमिंग'मधून स्पायडरमॅन सिरीजमध्ये पदार्पण करतोय.याआधी त्यानं केलेली टीम आर्यन मॅनची भूमिका प्रंचड गाजली होती.

टॉम स्वत: एक जिम्नॅस्ट आहे. एका मुलाखतीत त्याला टायगरबद्दल विचारलं असता तो म्हणाला 'टायगर माझ्याहून चांगला डान्सर आहे. बॉलिवूड डान्सिंग खरोखर मस्त आहे.'

तसंच आयुष्यामध्ये रोजच्या समस्यांसोबत एखादा सुपरहिरो असणं चांगलं असतं असंही तो म्हणाला.

स्पायडरमॅन ही पीटर पार्कर नावाच्या एका हायस्कूलच्या मुलाची गोष्ट आहे ज्याच्याकडे सुपरनॅचरल पॉवर्स आहेत.

First published: July 5, 2017, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading