यवतमाळमध्ये पार पडला पहिला समलिंगी विवाह सोहळा

अमेरिकेत स्थायिक झालेल्या शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबत लग्न केलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2018 09:22 PM IST

यवतमाळमध्ये पार पडला पहिला समलिंगी विवाह सोहळा

भास्कर मेहेरे, यवतमाळ

12 जानेवारी : यवतमाळमध्ये पहिला समलिंगी विवाह सोहळा पार पडला. अमेरिकेत स्थायिक झालेल्या शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबत लग्न केलंय. हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरलाय. या विवाहाला मात्र वराच्या आईने प्रचंड विरोध केला. त्यामुळे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

यवतमाळमधील पुस्तक व्यावसायिकाचा हा मुलगा अमेरिकेत रहायला असल्याने आणि त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी असल्याने, त्याच्याशी लग्न लावून द्यायला अनेक मुलींचे पालक तयार होते. या मुलाच्या घरचे जेव्हा स्थळं आणायचे, लग्नाबद्दल विचारायचे तेव्हा तो प्रत्येक स्थळाला नकार द्यायचा. अखेर घरच्यांनी त्याला यामागचं कारण विचारलं, तर उत्तर ऐकून त्यांना धक्काच बसला. या मुलाने घरच्यांना स्पष्टपणे सांगून टाकलं की, तो समलिंगी विवाह करणार आहे. या बातमीने घरचे प्रचंड नाराज झाले, खासकरून या मुलाची आई प्रचंड संतपाली आणि तिने या लग्नाला कडाडून विरोध केला. लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत हा विरोध कायम होता. या जोडप्यामध्ये वर हा यवतमाळचा असून वधू म्हणजेच त्याचा जोडीदार हा चिनी आहे.

३० डिसेंबर रोजी यवतमाळच्या स्टेट बँक चौकातील एका हॉटेलात हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे यावेळी देश-विदेशातील अवघे ७०-८० वऱ्हाड मंडळीच उपस्थित होती.

Loading...

लग्नापूर्वी दोघांनाही हळद लावण्यात आली होती. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग, हार आणण्यात आले आणि वैदिक मंत्रोच्चारात त्यांचं लग्न धुमधडाक्यात लावून देण्यात आलं. या लग्न सोहळ्याला अमेरिका, चिनमधून त्याचे ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता. लग्नानंतर हे नवं दाम्पत्य मात्र मधुचंद्राला निघून गेले आहे. मात्र, बरीच गुप्तता पाळल्यानंतरही या लग्नाचे फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल झाले असून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...