ममता कुलकर्णी दुबईत लपून बसली,लवकरच वर्सोवातले 3 फ्लॅट होणार जप्त

ममता कुलकर्णी दुबईत लपून बसली,लवकरच वर्सोवातले 3 फ्लॅट होणार जप्त

सोलापूरमधील अडीच हजार कोटींच्या इफेड्रीन ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या ममता कुलकर्णी आणि इतर चौघे अजूनही या प्रकरणात फरार आहेत. ठाणे पोलिसांना ममता कुलकर्णी ही दुबईमध्ये असल्याची माहिती मिळालीये.

  • Share this:

16 आॅगस्ट : सोलापूरमधील अडीच हजार कोटींच्या इफेड्रीन ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि इतर चौघे अजूनही या प्रकरणात फरार आहेत. ठाणे पोलिसांना ममता कुलकर्णी ही दुबईमध्ये असल्याची माहिती मिळालीये. तसंच लवकरच ममता कुलकर्णीचे मुंबईतील वर्सोव्यातले 3 फ्लॅट जप्त केले जाणार आहे.

अडीच हजार कोटींच्या इफेड्रींन ड्रग्स प्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपीने अटक केली असून त्यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. फरारी आरोपी दुबईत लपून बसल्याची सूत्रांची माहिती आहे.

पोलीस त्यांच्या लोकेशनवर लक्ष केंद्रीत करून असल्याची माहितीही रानडे यांनी दिली. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले विक्की गोस्वामी आणि अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यापैकी विक्की गोस्वामीला अमेरिकन पोलिसांनी अटक केली असून ममता भूमिगत झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे यांनी दिली.

"ममता कुलकर्णीला पूर्वीच फरारी घोषित करण्यात आले आहे. ममताच्या मुंबईतील वर्सोवा येथे तीन फ्लॅट असून त्यांना नोटीस चिटकवण्यात आल्यानंतर ममताच्या थांगपत्ता नसल्याने तिची संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली असून लवकरच न्यायालयाचे आदेश अपेक्षित आहेत. आदेश मिळताच तीन प्लॅटवर जप्ती कारवाई करण्यात येणार असल्याचं रानडे यांनी सांगितलं.

अटक आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, विक्की गोस्वामी याने इफेड्रींन भारतातून विदेशात नेऊन प्रक्रिया करीत ड्रग्स तयार करून ते बाजारात विकण्याचे प्लॅन असल्याची माहिती चौकशीत मिळाली असून या बाबत झालेल्या विदेशातही मिटींगला विक्की गोस्वामी आणि ममता कुलकर्णी असल्याचे ही अटक आरोपीने चौकशीत सांगितल्याचं रानडे यांनी सांगितलं.

आता ममताला कधी अटक होते, ते पाहायचं.

First published: August 16, 2017, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading