अशी लढवली अटलबिहारी वाजपेयींनी पहिली लोकसभा निवडणूक

तब्बल 52 वर्ष अटलजी संसदीय राजकारणात होते. त्यांचा निवडणूक लढण्याचा प्रवास सुरू झाला तो 1957 पासून...

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 08:47 PM IST

अशी लढवली अटलबिहारी वाजपेयींनी पहिली लोकसभा निवडणूक


नवी दिल्ली 25 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच राजकारणातलं स्थान खूपच मोठं होतं. भाजपला उभारी देण्यात आणि वाढविण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.  तब्बल 52 वर्ष ते संसदीय राजकारणात होते. त्यांचा निवडणूक लढण्याचा प्रवास सुरू झाला तो 1957 पासून.

स्वातंत्र्यानंतरची 1957 ची  दुसरीच सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं. पंडित जवाहरलाल नेहरुंचा करिष्मा होता. इतर पक्ष असले तरी त्यांना राजकारणा फारसं स्थान नव्हतं. त्या काळात काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवणं हे फारसं सोपं नव्हतं.

बलरामपूरचे उमेदवार

अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाचे नेते होते. पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर या मतदार संघातून तिकीट दिलं होतं. त्यावेळी वाजपेयी फक्त ३३ वर्षांचे होते. त्या निवडणुकीची अटलजींनी सांगितलेली आढवण अतिशय मजेदार आहे.

त्या काळात त्यांच्याकडे प्रचारासाठी पैसे नव्हते आणि साधनंही नव्हती. दोन जीप आणि मोजके कार्यकर्ते एवढीच त्यांच्याकडे असलेली साधनसामुग्री. त्यातली एक जीप पक्षाने दिली होती आणि दुसरी निवडणुकीपूरती त्यांनी भाड्याने घेतली होती. या दोन वाहनांच्या मदतीने त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचत असताना त्यांची जीप एका जंगलात बंद पडली. ती दुरूस्त होऊन  मतदान केंद्रावर पोहोचायला त्यांना संध्याकाळच झाली होती. तोपर्यंत मतदान संपून गेलं होतं. आपल्या पहिल्याच निवडणुकीत अटजलींना मतदान करता आलं नाही आणि शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांनाही भेटता आलं नाही.

 आणि निकाल लागला

मात्र निकाल जेव्हा लागला त्यात अटल बिहारी वाजपेयी विजयी झाले होते. आपण विजयी होऊ असं त्यांनाही वाटत नव्हतं. त्यावेळी लोकसभेच्या 494 जागा होत्या. जवाहरलाल नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 371 जागा जिंकल्या होत्या. 47.78 टक्के मतं काँग्रेसला मिळाली होती. तर जनसंघाला जेमतेम 6 टक्के मतांवर समाधान मानवं लागलं होतं. त्यांच्या फक्त 4 जागा जिंकून आल्या होत्या.

त्यानंतर 1967 मध्येही वाजपेयी बलरामपूरमधून दुसऱ्यांदा निवडून आले होते. 1977 मध्ये ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. 2004 पर्यंत हा मतदारसंघ अस्तित्वात होता. नंतर पुनर्रचनेत बदरामपूर मतदारसंघ राहिला नाही.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close