Home /News /entertainment /

साऊथ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पतीचं झालं निधन

साऊथ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पतीचं झालं निधन

मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री (South Actress) मीनावर (Meena) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे पती विद्यासागर यांचं निधन झालं (Meena husband Vidyasagar Death) आहे.

    मुंबई,29 जून- मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री  (South Actress) मीनावर (Meena) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे पती विद्यासागर यांचं निधन झालं (Meena husband Vidyasagar Death) आहे. ही दुःखद बातमी समोर आल्यानंतर साऊथ इंडस्ट्रीलाही धक्का बसला असून सोशल मीडियावर त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता सरथ कुमारने याबाबतच ट्विट करत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विद्यासागर यांचं सोमवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं होतं. असं सांगितलं जात आहे की त्यांना फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला होता आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. . मध्यंतरी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. साऊथ अभिनेता सरथकुमारने ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे. यासोबतच त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीही व्यक्त केली आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. सरथकुमारचं ट्विट पाहून प्रत्येकजण अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर हे एक मोठे उद्योजक होते. ते बंगळुरूमध्ये वास्तव्यास होते. 2009 मध्ये त्यांनी मीनाशी लग्न केलं होतं. या दोघांना नैनिका नावाची मुलगी आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मीना 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात सर्वात लोकप्रिय साऊथ अभिनेत्रींपैकी एक बनली होती. आपल्या अत्यंत यशस्वी कारकिर्दीत तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व प्रमुख कलाकारांसोबत काम केलं आहे. नैनिकानेही आपल्या आईसारखंच मास्टर विजयच्या 'थेरी' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली आहे. या अचानक समोर आलेल्या माहितीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South actress

    पुढील बातम्या