• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Big News: साऊथ सुपरस्टार विजयला धमकीचा कॉल, घर बॉम्बनं उडवण्याची मिळाली धमकी

Big News: साऊथ सुपरस्टार विजयला धमकीचा कॉल, घर बॉम्बनं उडवण्याची मिळाली धमकी

थालपथी विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तो नेल्सन दिलीप कुमारच्या बीस्टमध्ये काम करत आहे. जो एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे दिसणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर- 'मास्टर'   (Master)  फेम अभिनेता विजयचे  (Vijay)  घर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या आल्या आहेत. वृत्तानुसार, सोमवारी (15 नोव्हेंबर) पहाटे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यामध्ये चेन्नईतील विजयच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकारी आणि काही धाडसी पोलिसांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी पाठवले. मात्र, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (बीडीडीएस)स्निफर डॉग टीमला ही धमकी अफवा असल्याची आढळली आहे. याचा अर्थ बॉम्ब नव्हता. चांगली बाब म्हणजे कॉलच्या आधारे शोध घेतल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम जिल्ह्यातील मार्कनम येथील एस भुवनेश्वरन असे या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित कुमार यांना असाच धमकीचा फोन केला होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी देखील विजयच्या सालीग्रामम येथील घरावर आणि अभिनेता अजितच्या चेन्नईच्या इंजामबक्कम येथील घरी बॉम्बच्या बनावट धमक्या आल्या होत्या. मोठ्या व्यक्तींना फेक कॉलद्वारे धमक्या देणारा हा इसम भुवनेश्वरन मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. थालपथी विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तो नेल्सन दिलीप कुमारच्या बीस्टमध्ये काम करत आहे. जो एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: