'2.0'नंतर सुपरस्टार रजनीकांत दिसणार नवाजुद्दीनसोबत 'या' सिनेमात

'2.0'नंतर सुपरस्टार रजनीकांत दिसणार नवाजुद्दीनसोबत 'या' सिनेमात

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा सिनेमा '2.0' बाॅक्स आॅफिसवर धमाल करतोय. सगळे रेकाॅर्डस सिनेमानं मोडलेत. आता नवा सिनेमा घेऊन रजनीकांत येतोय.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा सिनेमा '2.0' बाॅक्स आॅफिसवर धमाल करतोय. सगळे रेकाॅर्डस सिनेमानं मोडलेत. आता नवा सिनेमा घेऊन रजनीकांत येतोय. हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

रजनीकांतच्या या सिनेमाचं नाव आहे 'पेटा'. महत्त्वाचं म्हणजे रजनीकांतसोबत अभिनेता नवाजुद्दीन आहे. नवाजनं स्वत: या सिनेमाचं पोस्टर ट्विट केलंय. दाक्षिणात्य सिनेमात नवाजुद्दीनचा हा डेब्यू आहे. या सिनेमाची रिलीज डेट अजून समोर आलेली नाही.

2.0 सिनेमामध्ये रजनीकांतचा रांगडा लुक पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे रजनीकांतच्या रोबो लुकमध्ये त्याची हेअर स्टाईल वेगळी आहे. डोक्याच्या मधोमध असलेला लाल रंगाचा पट्टा आणखी उठून दिसत आहे.

सिनेमातील चिट्टी आणि नीला यांच्याबरोबरचा रोबो स्टाईल रोमान्स लोकांना जास्त पसंत पडत आहे. चित्रपटातील खलनायक अक्षयकुमारचा असा लुक कधीही पाहायला मिळाला नाही. रजनीकांतसोबत लोक अक्षयला पाहण्याठी जास्त गर्दी करत आहेत.

अक्षयकुमारने रजनीकांतच्या रोबो स्टाईलला चांगली स्पर्धा दिली आहे. आपल्या अभिनयातून नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अक्षय करत असतो.चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचे सेटलाईट आणि डिजीटल हक्क एकूण 400 कोटींमध्ये विकले होते.

एका मुलाखतीत अक्षय कुमारनं या मेकअपबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, 'या व्यक्तिरेखेसाठी मी जेवढा मेकअप केलाय, तेवढा आतापर्यंत कधीच केला नाही. मेकअपलाच मला 4 तास लागायचे. पुन्हा तो काढण्यासाठी अडीच तास जायचे. ' अक्षय या सिनेमात खलनायकाची भूमिका करतोय.

अक्षय आणि रजनीकांतचा हा '2.0' सिनेमा रोबोटचा सिक्वल आहे. रजनीकांत यात डबल रोलमध्ये आहे, तर अक्षय खलनायक आहे. 400 कोटींचा बनलेला हा सिनेमा भारतातला सर्वात महागडा सिनेमा आहे.

#TRPमीटर : आदेश भाऊजींचं 'झिंगाट' झालं लोकप्रिय, 'हवा'चं भवितव्य धोक्यात

First published: December 6, 2018, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading