हैदराबाद, 23 डिसेंबर: सुपरस्टार रजनीकांतच्या (Rajinikanth) सिनेमालाही कोरोनाचा (Corona) फटका बसला आहे. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेले होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. अन्नाथे (Annaatthe shooting) सिनेमाच्या शूटिंगला कोरोनामुळे खीळ बसली आहे.
शूटिंग जोमात सुरू होतं. दरम्यान शूटिंगसाठी आलेल्या क्रू मेंबर्स आणि कलाकारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शूट अर्ध्यातच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्क 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. शूटिंगचं शेड्यूल पुढे ढकल्याण्यात आल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शूटिंग थांबवल्यामुळे रजनीकांत पुन्हा चेन्नईला जाणार आहेत. अन्नाथे सिनेमाचं शूटिंग हैदराबादला रामोजी फिल्म सिटी येथे सुरू होतं. सिनेमाचं हे शेड्यूल 45 दिवसांचं होतं. खबरदारी म्हणून निर्मात्यांनी इनडोर शूटिंगचा पर्याय निवडला होता.
Announcement : During routine testing at #Annaathe shoot 4 crew members have tested positive for Covid19. Superstar @rajinikanth and other crew members have tested negative. To ensure utmost safety #Annaatthe shooting has been postponed.
— Sun Pictures (@sunpictures) December 23, 2020
काही दिवसांपूर्वी अन्नाथे सिनेमाच्या क्रू मेंबर्सनी रजनीकांत यांचा वाढदिवसही साजरा केला होता. या सिनेमामध्ये सुपरस्टार रजनीकांत सोबत नयनातारा, कीर्ति सुरेश, मीना, खुशबू, प्रकाश राज यांसारखे कलाकार महत्वाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सिरुथाई शिवा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona