HBD Thalaiva: कधी बस कंडक्टरची नोकरी करणारा अभिनेता आज आहे 'साउथचा देव'

HBD Thalaiva: कधी बस कंडक्टरची नोकरी करणारा अभिनेता आज आहे 'साउथचा देव'

साउथ सिनेइंडस्ट्रीचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रजनीकांत यांचा आज 69 वा वाढदिवस.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : साउथ सिनेइंडस्ट्रीचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रजनीकांत यांचा आज 69 वा वाढदिवस. आपल्या स्टाइल आणि हटके अंदाजासाठी ओळखले जाणारे रजनीकांत त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘थलाइवा’ (Thalaiva) नावानं  लोकप्रिय आहेत. हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेलेल्या रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर ते रजनीकांत झाले. तर थलाइवा हे नाव त्यांना त्यांच्या चाहत्यांनी दिलं आहे.

रजनीकांत यांचं बालपण फारच हलाखीच्या परिस्थितीत गेलं. जेव्हा ते पाच वर्षांचे होते त्यावेळी त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी रजनीकांत यांच्या खांद्यावर आली. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कधी हमालाचं काम केलं तर कधी बस कंडक्टरची नोकरी.

अनुष्का शर्मानं शेअर केलं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य!

रजनीकांत यांनी ‘अपूर्वा रागनगाल’ या तमिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ज्यात त्यांच्या सोबत कमल हसन आणि श्रीविद्या यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. कन्नड नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांनी कधीच विचार केला नसेल की त्यांना कधी इतकी लोकप्रियता मिळेल. ते कधी साउथच्या लोकांचे देव होतील आणि त्यांना थलाइवा हे नाव मिळेल यांची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती.

मिताली मयेकरच्या बोल्ड लुकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा PHOTO

सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अनेक खलनायकी भूमिका साकारल्यानंतर शेवटी रजनीकांत यांनी नायक साकारला. एसपी मुथुरमन यांच्या 'भुवन ओरु केल्विकुरी' मध्ये त्यांना नायकांची भूमिका मिळाली. त्यानंतर मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी अशी जमली की त्यांनी जवळपास 25 सिनेमात एकत्र काम केलं.

दमदार अभिनयासोबतच रजनीकांत त्यांच्या हटके अंदाज आणि स्टाइलसाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सिग्नेचर वॉकसोबतच सिगारेट फ्लिप करण्याची त्यांची खास स्टाइल खूप पसंत केली जाते. खासकरुन त्यांचा हा अंदाज दाक्षिणात्य भागात खूप लोकप्रिय आहे. अनेकजण त्यांचा हा अंदाज कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा अंदाज अनेक वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे.

रॅम्पवॉक करताना घसरला साराचा पाय, कार्तिकनं असं सावरलं; पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: December 12, 2019, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading