मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महेशबाबूच्या मुलीने केला Selena Gomez सारखा डान्स; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

महेशबाबूच्या मुलीने केला Selena Gomez सारखा डान्स; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

साऊथ  (South)  सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू   (Mahesh Babu)  आपल्या जबरदस्त स्टाइलसाठी लोकप्रिय आहे. आता त्याची मुलगी तिच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,27  नोव्हेंबर-   साऊथ  (South)  सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू   (Mahesh Babu)  आपल्या जबरदस्त स्टाइलसाठी लोकप्रिय आहे. अभिनय असो वा नृत्य, फिटनेस असो किंवा पडद्यावरील अॅक्शन हा कलाकार प्रत्येक अँगलने करोडो चाहत्यांना प्रभावित करतो. एकेकाळी त्याची पत्नी नम्रता शिरोडकर देखील बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आणि ती मिस इंडिया देखील राहिली आहे. पण आता त्यांची मुलगी तिच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. नम्रता-महेशची मुलगी  (Daughter)  सिताराने (Sitara Dance Video)  नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या क्लिपमधील सिताराच्या डान्स मूव्हचे सर्वजण कौतुक करत आहेत.

नम्रतानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सिताराच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये महेश बाबूची मुलगी डीजे स्नेकच्या 'टाकी तकी' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या मूळ गाण्यात सेलेना गोमेझ त्डान्स करताना दिसली आहे. पण यात सितारााही अप्रतिम एक्सप्रेशन दाखवत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो, सिताराने डान्स करण्याची ही पहिली वेळ नाही.तिचे इन्स्टाग्रामवर सितारा घट्टमानेनी नावाचे स्वतःचे खाते देखील आहे. ज्यावर ती अनेकदा अशा पोस्ट टाकते. सिताराने 'ताकी तकी' गाण्यावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या डान्स टीचर अनी मास्टरसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

सिताराचे नृत्यकौशल्य पाहून तिनेही तिच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलेले दिसत आहे. आणि ती मोठी होऊन पडद्यावर करोडो हृदयांवर राज्य करणार हे नक्की असल्याचे दिसून येते. महेश बाबू अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. परंतु त्याची पत्नी लग्नापासून आणि मुलांचे संगोपन केल्यापासून ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर आहे. नम्रता भलेही चित्रपटसृष्टीपासून दूर गेली असेल, पण ती आपल्या मुलीला प्रत्येक गोष्टीत पारंगत करत आहे.महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर, ज्यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक म्हटले जाते. ते पालकत्वाचे प्रतीक मानले जातात. हे दोघेही आपल्या मुलांना दर्जेदार वेळ देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतात.

First published:

Tags: Entertainment, South indian actor