Home /News /entertainment /

साऊथ सुपरस्टार महेशबाबूला कोरोनाची लागण; समोर आली हेल्थ अपडेट

साऊथ सुपरस्टार महेशबाबूला कोरोनाची लागण; समोर आली हेल्थ अपडेट

बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.साऊथ सुपरस्टार (South Superstar) महेशबाबूला (Mahesh Babu) कोरोनाची लागण झाली आहे.

  मुंबई,7 जानेवारी-   कोरोनाचा प्रादुर्भाव   (Coronavirus)  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वसामांन्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच फटका बसला आहे. मनोरंजनसृष्टीत एकापाठोपाठ एक कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.साऊथ सुपरस्टार   (South Superstar)  महेशबाबूला   (Mahesh Babu)  कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता महेशबाबूस्वतः आपल्या सोशल मीडियावरून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह   (Mhesh Babu Covid 19 Positive)   आल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना खास आवाहनदेखील केलं आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता महेशबाबूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. महेशने याबद्दलची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी सर्व कोरोना नियमाचं पालन करून, होम आयसोलेशनमध्ये आहे. सर्व खबरदारी घेऊनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या सर्व नियमांचं पालन करत आहे. शिवाय मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व उपचार घेत आहे'.
  महेशबाबूने आपल्या चाहत्यांसाठी शिवाय आपल्या ओळखीच्या लोकांसाठी आवाहन करत म्हटलं आहे, 'मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच मी लस न घेणाऱ्यांना सांगू इच्छितो, त्यांनी लवकरात लवकर आपल्या लशीचे दोन डोस पूर्ण करावेत. कारण त्याने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणार नाही. शेवटी त्यांनीं लिहिलं कोरोना नियमांचं पालन करा आणि आपल्या घरी सुरक्षित राहा'. महेशबाबूची ही पोस्ट पाहून चाहते आणि त्याचे सर्व कलाकार मित्र तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. महेशबाबू नुकताच दुबईला गेला होता. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तो दुबईला गेला होता. महेशबाबू एक आठवडा दुबईत होता. दुबईमधून परतल्यानंतर त्याने आपली कोरोना टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबाचा रिपोर्ट अजून आलेला नाहीय.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Coronavirus, Entertainment, South indian actor

  पुढील बातम्या