तमिळ सिनेसृष्टीतील मेगास्टार विजय मक्कलने सालाबादप्रमाणे यावर्षीही ऑटो रिक्षा चालकांसाठी जेवणाची सोय केली होती. विजय उर्फ लाया थलापती दरवर्षी कामगार दिनाच्या दिवशी अर्थात १ मे रोजी रिक्षाचालकांना जेवण देतो. यावर्षी निवडणुकांमुळे या कार्यक्रमाला उशीर झाला. त्यामुळे अनेकांना विजय यावर्षी रिक्षा चालकांना जेवण देणार नाही असंच वाटत होतं.
#Thalapathy#Vijay's auto driver fans were treated to a sumptuous lunch and given gift items.. It was a delayed May Day special treat for them.. @BussyAnand was the Chief guest at this initiative on behalf of the star who is shooting for #Thalapathy63 now. Nice to see pic.twitter.com/phyumGAqiM
आपल्या शब्दाला जागत विजयने रिक्षाचालकांना जेवण आणि भेटवस्तू दिल्या. विजय दरवर्षी रिक्षावाल्यांना अन्नदान करतो. विशेष म्हणजे हा सगळा खर्च विजय एकटा उचलतो. त्याच्या या उद्दात कार्यामुळे तो ट्विटरवर ट्रेंडमध्येही होता. विजयचे सेक्रेटरी बस्सी आनंद यांनी या भोजनाची सर्व जबाबदारी सांभाळली होती.
#Thalapathy#Vijay doing his customary thing. Due to elections, Labour's Day lunch and special gifts to Auto Drivers got slightly delayed but fulfilled like he does without fail each year pic.twitter.com/GHJzRgiaU1
The International Worker's Day Is All About Honouring The Tireless Workers. #Vijay, Who Has A Habit Of Serving Lunch To Auto Drivers On Worker's Day Every Year, Has Provided Them Lunch And Gifts Yesterday. A Noble Gesture Indeed. #ThalapathyVijaypic.twitter.com/fPzVyvqZ65
— Theri Nanbans Kerala (@TheriNanbans_KL) May 26, 2019
Thalapathy's VMI Team Had Presented Some Gifts & Congratulated The Auto Drivers With A Lunch! Due To Busy Shooting Schedule, #Thalapathy Hasn't Attended The Event ! ❤️ pic.twitter.com/v1KUPkx0bd
विजयच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो थलापती सिनेमांत दिसणार आहे. तमिळ प्रेक्षकांसाठी त्याचा हा सिनेमा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. यात विजय मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नयनतारा आणि जॅकी श्रॉफही आहेत. थलापती ६३ सिनेमाला ए.आर. रेहमानने संगीत दिलं आहे.
सिनेमाचं दिग्दर्शन अटली यांनी केलं असून प्रोडक्शनची जबाबदारी कलपती यांनी सांभाळली आहे. अटली यांचा विजयसोबतचा हा सलग तिसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी मर्सल आणि सरकार या दोन सिनेमांत काम केलं.
राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी