'हा' दाक्षिणात्य 'कॉमेडी किंग' 'दबंग 3'मध्ये बनणार सलमानचा उजवा हात

अभिनेता सलमान खान सध्या दबंग सीरिजमधील तिसरा सिनेमा 'दबंग 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 02:47 PM IST

'हा' दाक्षिणात्य 'कॉमेडी किंग' 'दबंग 3'मध्ये बनणार सलमानचा उजवा हात

मुंबई, 21 एप्रिल :अभिनेता सलमान खान सध्या दबंग सीरिजमधील तिसरा सिनेमा 'दबंग 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील काही सीन लिक झाल्यानं वाद निर्माण झाला होता त्यानंतर आता या सिनेमाबाबत नवी माहिती समोर आली आहे. सलमानच्या दबंग 3 मध्ये साउथ कॉमेडियन अली बाशा दिसणार असून या तो सलमानच्या राइट हॅन्डची भूमिका साकारणार आहे. याशिवाय साउथप्रमाणे बॉलिवूडमध्येही तो कॉमेडी करताना दिसणार आहे.


'दबंग 3'चं दिग्दर्शन प्रभु देवा करत असून या सिनेमाच्या काही भागांचं शूटिंगही पूर्ण झालं आहे. या सिनेमामध्ये साउथ अभिनेता किच्चा सुदिप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कॉमेडीयन अली बाशा या सिनेमात सलमानचा उजवा हात असणार आहे. म्हणजेच त्याची या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच साउथ अभिनेता पवन कल्याणशी असलेल्या मैत्रीमुळे चर्चेत आला होता. तसेच हिंदी सिनेमा 'टोटल धमाल'मध्ये अलीने तमिळ गाइडची भूमिका साकारली होती.


दबंग सीरिजमधील पहिला सिनेमा हा 'गब्बर सिंह' या साउथ सिनेमाचा रिमेक होता. या साउथ सिनेमामध्ये अलीनं सांबाची भूमिका साकारली होती. जो सिनेमाचा नायक पवन कल्याणच्या खास मर्जीतील माणूस असतो. त्यानंतर आता अलीला सलमान सोबत हिंदी सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या सलमानसोबत अलीच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अली बाशा पुलिसांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता सलमानसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अली बाशा कितपत यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...