2020 या वर्षात भारतीय चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी अचानक एक्झिट घेतली. एका अभिनेत्याची दिवसा-ढवळ्या हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना त्याच्या शरीरावर चाकूचे वारही आढळले आहेत.
बंगळुरु, 21 ऑक्टोबर: भारतीय सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांनी या वर्षी कायमची एक्झिट घेतली. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता सुरेंद्र बंतवालची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. राहत्या घरामध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. सुरेंद्र यांच्या शरीरावर अनेक चाकूचे वारही पोलिसांना आढळून आले आहेत. रावडी शीटर सुरेंद्र बंतवालच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याचं कुटुंब आणि चाहते सध्या शोकसागरामध्ये बुडून गेले आहेत.
सुरेंद्र यांच्या हत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आर्थिक वादामुळे त्यांची हत्या झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सुरेंद्र यांच्या हत्येचा पोलीस सध्या तपास करत आहेत. 2018 साली सुरेंद्र यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते भारतीय जनता पार्टी (BJP)च्या कार्यकर्त्यांना धमकी देत होते.
Karnataka: Rowdy-sheeter Surendra Bantwal found dead at his apartment in Bantwal. Police rushed to the spot.
रावडी शीटर सुरेंद्र बंतवाल यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते दु:खात आहेत. सुरेंद्र यांनी Chali Polilu, Savarna Deergha Sandhi अशा सिनेमांमध्ये काम केलं होतं