दरम्यान चिरंजीवीचा हा लुक पाहून चाहतेच नाहीत तर अनेक कलाकारांनी देखील त्यावर कमेंट्स केल्या आहेत. 'अनेकांनी असा लुक केला आहे पण तुझ्यासारखा कुणीच नाही', अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी या फोटोवर केल्या आहेत. चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी त्याला 'Boss' असे वारंवार कमेंट्सच्या माध्यमातून म्हटले आहे. या फोटोवर देखील अशाच कमेंट्स येत आहेत. राम चरण, वरूण तेज, नागा बाबू, कल्याण देव या सेलिब्रिटींनी देखील चिरंजीवीच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. (हे वाचा-फरहानच्या गर्लफ्रेंडवर Gold Digger असल्याचा आरोप, तिच्या Wikipediaमध्ये छेडछाड) काही चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, चिरंजीवीने त्याचा हा नवीन लुक त्याच्या आगामी सिनेमासाठी केला आहे. Koratala Siva बरोबर चिरंजीवी 'आचार्य' (Acharya) नावाचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये चिरंजीवीबरोबर अभिनेत्री काजल अग्रवाल असणार आहे. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, या सिनेमामध्ये पाहुण्या कलाकारांच्या भुमिकेत राम चरण आणि रश्मिका मंदाना देखील दिसणार आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Superstrar chiranjeevi