मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /साऊथ अभिनेत्रीनं सलमान-गोविंदासोबत केला आहे रोमॅन्स, जीव दिल्याच्या बातमीनं आली होती चर्चेत, आता दिसते अशी

साऊथ अभिनेत्रीनं सलमान-गोविंदासोबत केला आहे रोमॅन्स, जीव दिल्याच्या बातमीनं आली होती चर्चेत, आता दिसते अशी

सलमान- गोविंदासोबत केला आहे रोमॅन्स

सलमान- गोविंदासोबत केला आहे रोमॅन्स

लग्नानंतर या अभिनेत्रीने चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवले. दरम्यान, अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातम्यांची जोरदार चर्चा रंगली होती. पण त्यानंतर त्या बातम्यांना अभिनेत्रीने अफवा म्हटले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च- भोळा चेहरा आणि चेहऱ्यावर कायम हास्य असलेली अभिनेत्री रंभा सर्वांना माहितीच असेल. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील रंभा मोठं नाव आहे. तिनं तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळमसहीत अन्य भाषेतील सिनेमात काम केलं आहे. साऊथ सिनेमात नाव कमावल्यानंतर रंभानं बॉलिवूडकडं तिचा मोर्चा वळवला. अभिनय आणि सुंदरतेच्या जीवावर तिनं बॉलिवूडमध्ये देखील वेगळी ओळख निर्माण केली.

रंभाने 1995 साली जल्लाद या सिनेमातून बॉलिवूड जगतात पहिलं पाऊल ठेवलं. या सिनेमात ती मिथुन चक्रवती यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. यानंतर रंभा 1996 मध्ये मिथुन चक्रवती यांच्यासोबत ‘जुर्माना’ सिनेमात दिसली होती. हळूहळु तिनं बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख निर्माण केली.

सलमान खान आणि गोविंदा सोबत देखील रंभाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. जेव्हा जेव्हा ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येत असे, तेव्हा ती धुमाकूळ घालत असतं. सलमान खानसोबतचा 'जुडवा' आणि गोविंदासोबतचा ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’ हे सिनेमे केले आणि सुपरहिट देखील ठरले. सलमान खान, गोविंदा यांच्याव्यतिरिक्त रंभाने बॉलिवूडमध्ये अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले आहे काम

रंभाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारसे काम केले नसले तरी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर या अभिनेत्रीने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभानं दक्षिण भारतीय चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सिनेसृष्टीत अफाट यश मिळवल्यानंतर अभिनेत्रीने 2010 मध्ये लग्न केले.

लग्नानंतर चित्रपटांपासून लांब राहणं केलं पसंत

लग्नानंतर या अभिनेत्रीने चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवले. दरम्यान, अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातम्यांची जोरदार चर्चा रंगली होती. पण त्यानंतर त्या बातम्यांना अभिनेत्रीने अफवा म्हटले होते. रंभा आज तीन मुलांची आई असून ती आपल्या कुटुंबासह परदेशात राहते. ती चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. आज या अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. यातील काही सिनेमात काम करतता. तर काही जणी संसारात रमलेल्या दिसतात. प्रियांका चोप्रा देखील लग्नानंतर परदेशात स्थायिका झाली आहे. ती हॉलिवूडमध्ये काम करताना दिसते. तर मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे देखील परदेशात स्थायिक झाली आहे. ती संसारात रमलेली आहे. पण सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.

First published:
top videos