मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पाहा कंगनाचा ‘Thalaivi’ अंदाज; बहुप्रतीक्षित ‘Chali Chali’ अखेर प्रदर्शित

पाहा कंगनाचा ‘Thalaivi’ अंदाज; बहुप्रतीक्षित ‘Chali Chali’ अखेर प्रदर्शित

 ‘थलाइवी’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापसूनचं सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अम्मा म्हणजेच जयललिता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘थलाइवी’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापसूनचं सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अम्मा म्हणजेच जयललिता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘थलाइवी’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापसूनचं सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अम्मा म्हणजेच जयललिता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मुबई, 2 एप्रिल- ‘थलैवी’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापसूनचं सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अम्मा म्हणजेच जयललिता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच आता या चित्रपटातील पाहिलं गाणं ‘चली चली’ आज प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत.

दक्षिणात्य चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकर्त्या जयललिता यांच्या आयुष्याचा उलघडा करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौतनं मुख्य भूमिका साकारली आहे. नुकताच प्रदर्शित झालेलं गाणं ‘चली चली’ पाहून प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. कारण या गाण्यातील दृश्ये जयललिता यांच्या एका चित्रपटावर आधारलेली आहेत. 1965 मध्ये आलेला चित्रपट ‘वेणीरा अडाई’ असं त्याचं नाव आहे. जयललिता यांच्या आयुष्यातील काही गोष्टी दाखविण्यासाठी त्यांच्या चित्रपटांचं अनुकरण यात करण्यात आलं आहे.

" isDesktop="true" id="536540" >

जयललिता यांनी खुपचं कमी वयात चित्रपटात अभिनय करण्यास सुरुवात केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःचे चित्रपट पाहण्याची परवानगी न्हवती. कारण हे चित्रपट ‘अ’ प्रमाणपत्रीत होते. आणि त्यांचं वय कमी होतं. कंगनाने या गाण्यात जयललितांना हुबेहुबे उतरविण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. असं म्हटलं जातं आहे की या गाण्याच्या शुटींगसाठी कंगना तब्बल 24 तास पाण्यात उभी होती. जीवी प्रकाश कुमार यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. आणि सैन्धवी यांनी हे गाणं गायलं आहे.

(हे वाचा: स्टंटमनचा मुलगा झाला सुपरस्टार; पाहा बॉलिवूडमधील 'सिंघम'च्या खास गोष्टी )

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्खीनेनी हिनं नुकताच आपल्या सोशल मीडियाद्वारे हे गाणं प्रदर्शित केलं होतं. समंथानं हिंदी, तमिळ आणि तेलुगु अशा तिन्ही भाषेत हे गाणं प्रदर्शित केलं आहे. त्याचप्रमणे तिनं जयललिता यांना अभिवादन दिलं आहे. 23 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कंगनाने आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास पुरेपूर पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. त्यामुळे पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनाबरोबरच चाहत्यांची ‘अम्मा’ ला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

First published:

Tags: Bollywood, Kangana ranaut