मुंबई, 06 जानेवारी : साऊथ सिनेविश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सुनील बाबू यांचं निधन झालं आहे. त्यांची वयाच्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं सुनील यांचं निधन झालं. बँगलोर डेज, गजनी सारख्या मोठ्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे. थलपती विजयच्या वरिसू सिनेमामुळे ते चर्चेत आले होते. अंजलि मेनन यांनी सुनील बाबूच्या निधनाची माहिती दिली आहे. सुनील बाबूच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुनील बाबूला हृदयविकाराचा झटका आला. ते रुग्णालयातच होते. मीडिया रिपोर्टनुसार, तीन दिवसांआधी त्यांच्या पायाला सूज आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलुगू, तमिळ तसंच हिंदी सिनेमांसाठी आर्ट डिझानयिंग केलं आहे. त्यांनी आर्ट डायरेक्टर साबू सिरिल यांच्या मदतीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. सुनील बाबू यांच्या कामासाठी त्यांना अनेक अवॉर्ड्सनी गौरवण्यात आलं आहे. साऊथ सिनेमांबरोबरच त्यांनी अनेक प्रसिद्ध हिंदी सिनेमांसाठीही काम केलं. 'सिंग इज किंग', 'एमएस धोनी', 'पा', 'लक्ष्य', 'स्पेशल 26' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे. त्याचप्रमाणे सुनील यांनी रोज सारख्या हॉलिवूड सिनेमासाठीही आर्ट डायरेक्शन केलं होतं.
हेही वाचा - Tunisha Sharma: तुनिषा शर्मानंतर 'ही' अभिनेत्री बनणार नवी 'मरियम'? समोर आलं नाव
View this post on Instagram
सुनील बाबू यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना धक्का बसला आहे. अंजली मेनन, दुलकर सलमान सारख्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कलाकारांनी सोशल मीडियावरून सुनील बाबू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अंजली मेनन हिनं सुनील बाबूचा फोटो शेअर करत म्हटलंय, सुनील बाबूच्या निधनाची बातमी ऐकली आणि मी स्तब्ध झाले. आम्ही बँगलोर डेजमध्ये एकत्र काम केलं होतं. कधीच विसरू शकणार नाही अशा आमच्या आठवणी माझ्याकडे आहे आणि त्या माझ्यासाठी कायम स्पेशल राहतील. सुनीलच्या आत्म्यास शांती मिळो.
अभिनेता थलपती विजयचा वारिसू सिनेमाची सुनील बाबू वाट पाहत होते. वारिसूसाठी सुनील बाबूनी आर्ट डायरेक्शन केलं होतं. पोंगल्या मुहूर्तावर 11 जानेवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.