• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'पलट' श्रुती मराठेची DDLJ स्टाईल; अभिनेत्रीचा हा VIDEO एकदा पाहाच

'पलट' श्रुती मराठेची DDLJ स्टाईल; अभिनेत्रीचा हा VIDEO एकदा पाहाच

झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती.

 • Share this:
  मुंबई, 2 जुलै- मराठी (Marathi) तसेच साउथमध्ये (South) आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री (Actress) म्हणजे श्रुती मराठे (Shruti Marathe) होय. श्रुतीचा बिनधास्त अंदाज सर्वांनाचं भावतो. श्रुती चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरसुद्धा ऍक्टीव्ह असते. श्रुती नेहमीचं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर पोस्ट शेयर करत असते. तसेच सतत नवनवीन फोटोशूट आणि इन्स्टाग्राम रीलसुद्धा (Instagram Reel) बनवत असते. श्रुतीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आ जा सनम मधुर चांदणी मैं हम’ या गाण्याचा एक सुंदर रील शेयर केला आहे.
  अभिनेत्री श्रुती मराठे सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडे श्रुतीने मोठ्या प्रमाणात वजन कमी केलेलं दिसत आहे. तिचा हा स्लीम ट्रीम लुक चाहत्यां खुपचं भावत आहे. नुकताच श्रुतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ एक सुंदर इन्स्टाग्राम रील आहे. एव्हरग्रीन सॉंन्ग ‘आ जा सनम मधुर चांदणी मैं हम’ या गाण्यावर श्रुतीने हा सुंदर रील बनवला आहे. तसेच व्हिडीओला कॅप्शन देत ‘पलट’ असं लिहिलं आहे. कारण व्हिडीओमध्ये श्रुती पुढ चालत जातेय आणि नंतर वळून मागे पाहते. हे पाहून सर्वांना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाची आठवण होतं आहे. (हे वाचा:सई लोकूरचा कोल्हापुरी तडका; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ) अभिनेत्री श्रुती मराठेने चाहत्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. साउथ चित्रपटातून करियरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने मराठी मनोरंजन क्षेत्रातसुद्धा मोठी लोकप्रियता मिळवली आहे. झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती. या मालिकेत श्रुतीने एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. जी आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलाच्या प्रेमात पडते. ही मालिका दर्शकांना खुपचं पसंत पडली होती. त्याचबरोबर श्रुतीने स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मुंबई pune मुंबई 2’ मध्येसुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: