दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती झाली MISS UNIVERSE

दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती झाली MISS UNIVERSE

अमेरिकेतील अटलांटा इथे झालेल्य़ा 68व्या Miss Universe 2019 स्पर्धेत 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर: यंदा Miss Universe 2019 चा मान साउथ अफ्रिकेच्या सुंदरीनं पटकावला आहे. अमेरिकेतील अटलांटा इथे रविवारी 68व्या Miss Universe स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासोहळ्यात जगभारतील एकूण 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या सौंदर्यवतींना मागे टाकत Miss Universe 2019 होण्याचा बहुमान साऊथ अफ्रिकेच्या जोजिबिनी (Zozibini Tunzi)तुंजीने पटकावला आहे. सौंदर्यवती जोजिबिनी(Zozibini Tunzi)ने जेव्हा विश्वसुंदरीचा मुकूट परिधान केला तेव्हा ती अति भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

विश्व सुंदरी जोजिबिनीने शेवटच्या राऊंडसाठी गोल्डन रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. जेव्हा तिचं नाव विश्व सुंदरी म्हणून घोषित करण्यात आलं त्यावेळी जोजिबिनीला अश्रू अनावर झाले. तिने सगळ्या प्रश्नांची हजरजबाबीपणाने खूप चांगली उत्तर दिल्याचं परीक्षकांनी सांगितलं. जोजिबिनीच्या उत्तरांवर परीक्षक खूप खूश असल्याचं पाहायला मिळालं.

मिस मैक्सिको आणि जोजिबिनी यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. सौंदर्यवती मैक्सिकोला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यामध्ये साउथ अफ्रिका, मेक्सिको, कोलंबिया, थायलंड, प्‍यूरटोरिको या देशांमधील सौंदर्यवती पहिल्या 5 मध्ये होत्या. तर पहिल्या दहामध्ये येण्याचा मान भारतातील सौंदर्यवती वर्तिका सिंहने पटकावला होता. 2018 रोजी मिस युनिवर्सचा किताब पटकवलेल्य़ा कॅटोरिना ग्रेने जोजिबिनी तुंजीला मुकूट परिधान केला.

missuniverse.comवरून मिळालेल्या माहितीनुसार विश्वसुंदरी जोजिबिनी ही साउथ अफ्रिकेतील टोस्‍लो इथली रहिवासी आहे. तिने समाजसेवेसाठी वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत उल्लेखनीय कामं केली आहेत. समाजसुधारणेच्या हेतूनं मीडिया कॅम्पेनिंग राबवले आहेत. तिथे जाचक रुढी आणि प्रथांविरोधातही सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला आहे. जोजिबिनी तुंजीचं स्वत:वर खूप प्रेम आहे. स्वत:वर भरभरून प्रेम करायला हवं असा संदेशही ती इतर महिलांना देते. जोजिबिनी आपल्या तीन बहिणींसोबत टोस्लो इथे राहाते. या स्पर्धेत भाग घेण्याआधी ती केपटाउन इथे पब्लिक रिलेशंस डिपार्टमेंटमध्ये इंटरनशिप करत होती. माझे वडिल माझा आदर्श असल्याचंही तिने यावेळी सांगितलं.

या स्पर्धेत भारताकडून वर्तिका सिंहने सहभाग घेतला होता. पहिल्या 10मध्ये वर्तिका येऊ न शकल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. या आधी भारताकडून सुष्मिता सेन, लारा दत्ता, मानुषी छिल्लर यांनी विश्व सुंदरीचा किताब पटकावला आहे.

वर्तिका सिंह ही लखनऊ इथली रहिवासी आहे. मिस युनिवर्सच्या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिच्या सौंदर्याची आणि तिची तुफान चर्चा झाली होती. पहिल्या 10मध्ये येण्याचा मान मात्र वर्तिकाला मिळवू शकली नाही. त्यामुळे वर्तिकाच्या चाहत्यांमध्ये थोडी नाराजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading